Spitting Fine: मुंबईत थुंकणे सुरूच; कोर्टाने नाराजी व्यक्त करूनही कारवाई शून्य

सध्या थुंकणाऱ्यांकडून २५० रुपये दंड आकारला जातो. यात वाढ करायची असेल तर तसा प्रस्ताव महापालिका सभागृहात मंजूर होणे आवश्यक आहे
Spitting Fine
Spitting FinePudhari
Published on
Updated on

मुंबई: सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या प्रवृत्तीला ‘राष्ट्रीय छंद' असल्याचे म्हणत, हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त करत दोन हजार रुपये दंड वसूल करा, असे आदेश महापालिका प्रशासनाला दिले होते. मात्र अद्यापपर्यंत याची कोणतीही अंमलबजावणी न झाल्यामुळे शहरातील सार्वजनिक ठिकाणी थुंकणे सुरूच आहे.

शहरातील सार्वजनिक ठिकाणांसह रस्त्यांवर अथवा पदपथांवर कचरा टाकणे, थुंकणे व संपूर्ण परिसर अस्वच्छ करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेमध्ये क्लीन-अप मार्शल योजना सुरू होती. मात्र पालिकेने अन्य पर्यायी व्यवस्था उभी न करता ही योजना बंद केली.

Spitting Fine
Mumbai Local Mega Block: मुंबई लोकल प्रवाशांनो लक्ष द्या! उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक; गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

त्यामुळे मुंबई अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांची संख्या पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढली. विशेषत: थुंकणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मोठे असून याबाबत हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नाही तर अशा प्रवृत्तीच्या नागरिकांना आळा घालण्यासाठी दंडाची रक्कम दोन हजार रुपये करा असे निर्देशही दिले होते. परंतु हायकोर्टाच्या या निर्देशाकडे महापालिकेकडून दुर्लक्ष करण्यात आले असून शहरात थुंकणे सुरूच आहे.

तातडीने दंड वाढवणे शक्य नाही

सध्या थुंकणाऱ्यांकडून २५० रुपये दंड आकारला जातो. यात वाढ करायची असेल तर तसा प्रस्ताव महापालिका सभागृहात मंजूर होणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर राज्याच्या नगर विकास विभागाचीही याला मंजुरी लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाला तातडीने दंड वाढवणे शक्य नाही. मात्र येणाऱ्या काळात हायकोर्टाच्या निर्देशानुसार दंड वाढवला जाईल, असे पालिकेच्या घनकचरा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

Spitting Fine
Nashik Kumbh Mela Contracts: ‘मराठी कंत्राटदारांची नावे पाठवतो’; कुंभमेळ्याच्या कंत्राटांवरून फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला

सध्याचा दंड

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे - ५०० रुपये

थुंकणे - २५० रुपय

सार्वजनिक ठिकाणी आंघोळ - ३०० रुपये

लघवी करणे - ५०० रुपये

शौच करणे - ५०० रुपये

प्राणी, पक्ष्यांना खाद्य देणे - ५०० रुपये

भांडी, कपडे धुणे - ५०० रुपये

वाहने धुणे - ३०० रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news