Praveen Darekar : "आधी दुष्काळ म्हणजे काय समजून घ्या..."; CM फडणवीसांवर स्तुतीसुमने उधळत आ. दरेकरांचा विरोधी पक्षांवर निशाणा

दुष्काळावर राजकारण करून पोळी भाजण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न भाजपने फोल ठरवला
Praveen Darekar on Maharashtra drought
प्रवीण दरेकर. Pudhari
Published on: 
Updated on: 

Praveen Darekar on drought :

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर जातात काय? यानंतर तत्काळ दुष्काळाची घोषणा करतात काय, यातून त्यांची संवेदना आणि कार्यतत्परता दिसून येते. बोले तैसा चाले त्याची वंदवी पाऊले," अशी स्तुतीसुमने उधळत विरोधी पक्षांनी - कोरडा दुष्काळ म्हणजे काय, त्याचे निकष काय समजून घ्यावे. त्यांनी यावर राजकारण करू नये. दुष्काळावर राजकारण करून पोळी भाजण्याचा प्रयत्न फोल ठरवला आहे, अशा शब्दांमध्ये भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी आज विरोधी पक्षांवर निशाणा साधला.

विरोधकांनी मोठं मन दाखवावं

माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, "दुष्काळ प्रश्नी विरोधी पक्ष राजकारण करत आहेत. आता त्यांनी मोठं मन दाखवावं. राज्यातील शेतकऱ्यांचा तिजोरीवर हक्क आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५८ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण आवश्यक त्या सर्व ठिकाणी दुष्काळ जाहीर केला आहे. पाणी, चारा, शिक्षण सवलती सर्व निर्णय शेतकरी केंद्रित ठेवून घेतले आहेत. हा निर्णय स्वागतार्ह आणि अभिनंदनीय आहे."

Praveen Darekar on Maharashtra drought
Maharashtra Drought: महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर! फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

जीआर नीट वाचा, काय लिहिलंय ते बघा

विरोधी पक्षांनी दुष्काळ समजून घ्यावा. आवश्यक ते सर्व निर्णय मुख्यमंत्री घेतील. शेतकरी हिताच्या बाबींवर काम होईल. विरोधी पक्षांनी शासन निर्णय (जीआर) नीट वाचावा. त्यामध्ये काय लिहिलं आहे ते बघा. पोकळ टीका करण्याचं काम विरोधक करत आहेत. विरोधकांच्या सूचनांचा स्वीकार आहे. मात्र त्यांनी शेतकरी प्रश्नाचे राजकारण करू नये, आपली संस्कृती जपण्याचे काम करा, असे आवाहनही त्यांनी केले.

काय व्हायला हवं, काय झालं ते कळलं पाहिजे

आदित्य ठाकरे यांनी कोरडा दुष्काळ म्हणजे काय, त्याचे निकष काय ते समजून घ्यावे. मात्र त्याआधी काय व्हायला हवं, काय झालं ते कळलं पाहिजे. शेती म्हणजे काय, दुष्काळ म्हणजे काय ते कळतं का, असा सवाल करत त्यांनी केलेली टीका हा बालिशपणा आणि भंपकपणा आहे. कधीतरी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. हवेत गोळीबार करू नका. आदित्य ठाकरे आणि रोहित पवार हे प्रसिद्धीसाठी स्टंट करतायत, असा आरोपही त्यांनी केला. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. गरज असेल तर अधिवेशनाबाबत निर्णय होईल. सर्वात वेगवान निर्णय दुष्काळाबाबत झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Praveen Darekar on Maharashtra drought
Ravikant Tupkar: दुष्काळ जाहीर; तुपकरांचा सरकारला इशारा, हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी

सतेज पाटील मंत्री होते, यंत्रणा कशी काम करते त्यांना माहिती

महाविकास आघाडी सरकारमध्ये सतेज पाटील हे मंत्री होते. त्यामुळे यंत्रणा कशी काम करते ते त्यांना माहिती आहे. प्राधान्याने काय घ्यायचं ते त्यांनी सांगावं, आवश्यक ते सर्व करू. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून काम सुरू आहे, असेही दरेकर म्हणाले.

नौटंकीला जनता भीक घालणार नाही

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ४ ऑक्टोबर रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. यावर बोलताना दरेकर म्हणाले की, "राज्यातील विरोधी पक्षाला सूर सापडत नाही. निमित्त काढून आपण आहोत ते दाखविण्याचा आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नौटंकीला जनता भीक घालणार नाही," असेही दरेकर यावेळी म्हणाले.

Praveen Darekar on Maharashtra drought
Sangli DCC Bank Election : निवडणूक जाहीर होताच हालचाली गतिमान

जरांगेंना मुंबईचे आकर्षण...

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना मुंबईचं आकर्षण आहे. आम्ही त्यांचं स्वागत करू. त्यांचा पाहुणचार करू, अशी घोषणा केली.

काम कोण करतंय ते जनता पाहतेय

रोहित पवारांचे आंदोलन हे वरती मागून घोडे नाचवण्याचा प्रकार आहे. श्रेय लाटण्याचा डाव आहे. पीडिताला मदत देण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असतो. आम्ही शेतकऱ्यांशी बांधील आहोत. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बांधावर आहेत. काम कोण करतंय ते जनता पाहतेय, असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news