Powai Crime Case: पवईत 3 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; जन्मदात्या पित्यासह आजोबांविरुद्ध गुन्हा दाखल

चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
molestation case
molestation casePudhari
Published on
Updated on

मुंबई: पवई येथे एका तीन वर्षांच्या अल्ववयीन मुलीवर तिच्याच जन्मदात्या पित्यासह वयोवृद्ध आजोबांनी लैंगिक चाळे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आरोपी पित्यासह वयोवृद्ध आजोबाविरुद्ध पवई पोलिसांनी लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर ती तिच्या मुलीला तिच्या वडिलांकडे घेऊन जात होती. मुंबईत तिचे वडिल आणि आजोबा पवईतील एका फ्लॅटमध्ये तिच्यासोबत वेळ घालवत होते. डिसेंबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत तिच्या वडिलांनी तिच्याशी अश्लील चाळे, तर तिच्या वयोवृद्ध आजोबांनी लैंगिक अत्याचार केला होता. अलीकडेच हा प्रकार तक्रारदार महिलेच्या लक्षात आला होता.

molestation case
BMC Promotion News: महापालिकेतील 161 साहाय्यक अभियंत्यांची होणार पदोन्नती

या प्रकारानंतर तिने पवई पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्या पतीसह सासऱ्याविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी लैंगिक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यात त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. ते दोघेही बंगलोरला राहत असल्याने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे लवकरच समन्स बजाविले होते. चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

molestation case
Police Transfer 2026: नवी मुंबईतील 700 पोलिसांच्या मेअखेर किंवा जूनमध्ये बदल्या

ते दोघेही बंगलोरचे रहिवाशी असल्याने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे. नात्याला आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने पिडीत मुलीच्या कुटुंबियांसह नातेवाईकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

तक्रारदार महिला ही कांजूरमार्ग परिसरात तिच्या पिडीत तीन वर्षांच्या मुलीसोबत राहते. तिचा पती बंगलोरचा रहिवाशी आहे. या दोघांमध्ये कौटुंबिक वाद असल्याने त्यांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news