Police Transfer 2026: नवी मुंबईतील 700 पोलिसांच्या मेअखेर किंवा जूनमध्ये बदल्या

या बदली प्रक्रियेत सहायक पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई पदांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
Police Transfer 2026
Police Transfer 2026Pudhari
Published on
Updated on

नवी मुंबई: नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात जूनच्या पहिल्या आठवड्यात सुमारे 700 हून अधिक पोलिसांच्या सार्वत्रिक बदल्या होण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये याबाबत पसंतीची तीन ठिकाणे कर्मचाऱ्यांनी बदलीच्या अर्जात नमूद करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे येत्या मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पोलीस कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या होतील.

या बदली प्रक्रियेत सहायक पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई पदांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकाच पोलीस ठाण्यात पाच वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसह विनंती बदलीसाठी अर्ज केलेल्या कर्मचाऱ्यांचाही प्रक्रियेत समावेश असणार आहे.

Police Transfer 2026
Maharashtra farming news| अल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सावध; शेतीचे नुकसान टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना: कृषीमंत्री

नवी मुंबई पोलीस आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार या बदल्या केल्या जाणार आहेत. पोलीस आयुक्तांनी बदलीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांकडून तीन पसंतीच्या ठिकाणांसह अर्ज एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मागवले आहेत. त्यानुसार पोलीस उपायुक्त मुख्यालयाकडून आलेल्या अर्जांची छाननी आणि पात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे.

एप्रिलपासून या बदली प्रक्रियेला सुरूवात झाली. अखेर सर्व कर्मचांऱ्याचे सेवा पुस्तक तपासणीअंती पाच वर्षे कालावधी पूर्ण केलेले कर्मचारी, विनंती अर्ज केलेले कर्मचारी आणि मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांची यादी मेच्या हिल्या आठवड्यात तयार केली जाणार आहे.

Police Transfer 2026
Dadar Railway New Platform: दादर स्थानकावर नवा प्लॅटफॉर्म; पिक अवरमध्ये अधिक लोकल धावण्यासाठी मार्गिकेचा विस्तार

त्यानंतर आस्थापना मंडळाच्या बैठकीत बदलीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी मंजुरीला घेतली जाणार आहे. त्यानंतर पोलीस आयुक्तलयातील आस्थापना मंडळाच्या निर्णयानुसार या बदल्या मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहेत.

पोलीस ठाणे, नियंत्रण कक्ष, पोलीस मुख्यालय, अतिक्रमण, अंमली विरोधी शाखा, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, आरबीआय, अतिक्रमण, मोटार वाहन विभाग आणि विशेष शाखेत कालावधी पूर्ण केलेल्या पोलिसांचा बदली प्रक्रियेत समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news