Samar Khadas Viral Video: वोटचोरीवरून 'समर प्रसंग'! व्हायरल व्हिडिओवर मुंबई प्रेस क्लब अध्यक्षांचं स्पष्टीकरण

Mumbai Press Club: मुंबई प्रेस क्लब येथे मोठा वाद
मुंबई
मुंबई : मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष समर खडस आणि इंडिया टीव्हीचे वार्ताहर राजेश कुमार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.Pudhari News Network
Published on
Updated on

Samar Khadas Viral Video News

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत वोटचोरी झाल्याचा दावा करणाऱ्या महाराष्ट्र मॅन्युप्युलेटेड या माहितीपटाचे प्रदर्शन आणि वार्तांकनावरून मुंबई प्रेस क्लब येथे शनिवारी (दि.25) मोठा वाद झाला.

हा राजकीय माहितीपट दाखवण्यास परवानगी देतानाच या माहितपटाचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना प्रेसक्लबचे अध्यक्ष समर खडस यांनी मज्जाव केला, त्यांना सभागृहातून बाहेर काढत केला, त्यांना सभागृहातून बाहेर काढत वाहिन्यांच्या कॅमेऱ्यांचे स्टँडही त्यांनी स्वतःच हटविले. यावेळी खडस आणि वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांमध्ये शाब्दिक वादावादी आणि धक्काबुक्कीही झाल्याचे व्हिडीओ रविवारी समाजमाध्यमात व्हायरल झाले.

मुंबई प्रेस क्लबच्या फिल्म स्टडी ग्रुपकडून शनिवारी महाराष्ट्र मॅन्युप्युलेटेड या माहितीपटाचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. एरव्ही इथे आठवड्याला गाजलेले उद्बोधक चित्रपट दाखवले जातात आणि त्याची पटकथाही आधीच संक्षेपात कळवली जाते. मात्र मतचोरी सारख्या ताज्या राजकीय विषयावर तयार करण्यात आलेला असा माहितीपट प्रथमच क्लबमध्ये दाखवला गेला असावा.

मुंबई
Mumbai News : एशियाटिकच्या निवडणूक प्रक्रियेबद्दल धर्मादाय आयुक्तांकडे नवी तक्रार !

महाराष्ट्रात सगळ्यात मोठी मतचोरी कशी झाली पहा, असे सांगत माहितीपटाचे निर्माते परंजॉय गुहा ठाकुरता यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रेक्षकांना प्रेस क्लबमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची पूर्वकल्पना असल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अन्य काही नेत्यांनीही तसेच आवाहन केले होते.

या माहितीपटाच्या प्रदर्शनावेळी वार्तांकनासाठी आलेल्या वाहिन्यांच्या पत्रकारांना मात्र मज्जाव करण्यात आला. माहितीपटाचे वार्तांकन नको, प्रदर्शनानंतर प्रश्नोत्तराच्या वेळात चित्रीकरण व वार्तांकन करा, असा सल्ला देण्यात आला आणि यावरून प्रेस क्लबचे अध्यक्ष समर खडस आणि वाहिन्यांच्या पत्रकार वाद झाला. वार्तांकनासाठी आलेले इंडिया टीव्हीचे पत्रकार राजेश कुमार यांच्याशी खडस थेट भिडले. यावेळी झालेल्या बाचाबाचीचे व्हिडीओ रविवारी समाजमाध्यमात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले.

गजाभाऊ या नावाने एक्स अकाऊंटवर या बाचाबाचीचे व्हिडिओ शेयर करण्यात आले. हे अकाऊंट राष्ट्रवादी शरद पवार गटाशी जवळीक असलेले मानले जाते. मुंबई प्रेस क्लब मध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीत व्होटचोरी कशी झाली याची डॉक्युमेंट्री दाखवण्यात येणार होती, तिचे कव्हरेज मिडियाने करू नये म्हणून प्रेस क्लबचे अध्यक्ष समर खडस अन पत्रकारात शिवीगाळ झाली असे म्हणत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला.

मुंबई
Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर ते कशेडी दरम्यान मृत्यूचं तांडव! ९ महिन्यांत ३६ बळी

महाराष्ट्रात झालेल्या मतचोरीचा माहितीपट प्रेसक्लबमध्ये दाखवण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाखवताना त्याचे वार्तांकन रोखण्यात कुठे गेले हे स्वातंत्र्य असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. वादावादीच्या घटनेनंतर माहितीपटाचे प्रदर्शन मात्र नंतर सुरळीतपणे पार पडले.

समर खडस यांनी काय म्हटले आहे?

प्रेस क्लबला सिनेमापासून चर्चासत्रांपर्यंत असंख्य कार्यक्रम होत असतात, त्यात कधीही कुठला पक्ष अधिकृत निमंत्रण पाठवत नाही व तसे निमंत्रण कुठल्याही राजकीय पक्षाने पाठवणे हे योग्यही नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाने म्हणजे नक्की कुणी दिले, असे विचारले असता ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्याचे यातील एकाने सांगितले. त्यानंतर मी त्यांना हा कार्यक्रम प्रेस क्लबचा असून काँग्रेस पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नाही. इथे लोकांना अडचण होते आहे, त्यामुळे तुम्ही बाहेर जा, असे सांगितले. त्यानंतर चॅनेलचा एक पत्रकार व इतर काही कॅमेरामन यावर वाद घालू लागले. तुम्ही बाहेर जायल सांगणारे कोण, इथून वादाला सुरुवात झाली, अशी फेसबुक पोस्ट समर खडस यांनी शेअर केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news