Rohit Pawar| विधानसभा निवडणुकांत जनता मिर्च्यांचा धूर देईल; रोहित पवार

Rohit Pawar
Rohit Pawar

पुढारी ऑनलाईन डेस्क: अंमलबजावणी संचालयानं (ईडी) अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई रद्द केली. यामुळे प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला. यावरून आमदार रोहित पवार यांनी "आगामी विधानसभा निवडणुकांत जनता मिर्च्यांचा धूर देईल" असे म्हणत सत्ताधारी सरकारला लक्ष्य केले आहे. या संदर्भातील 'X' पोस्ट आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे.

Rohit Pawar: 'जनता नाकी नऊ आणल्याशिवाय राहणार नाही'

आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे की, "सत्तास्थापनेच्या तडजोडीत जनमताने दिलेला ठसका विसरून ज्यांना जनतेनेही नाकारलं. अशांना क्लीनचीट दिली जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये हीच जनता 'मिर्च्यां'चा धूर देऊन, भाजपच्या नाकी नऊ आणल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित, अशी देखील टीका केली आहे.

'भाजपने दोषींना वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ करून घेतले'

लोकसभा निवडणुकांत ईडीच्या माध्यमातून केलेल्या राजकारणाचा भाजपला सर्वाधिक फटका बसला. दोषींवर कारवाई केलीच पाहिजे, परंतु भाजपने दोषींना वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ करून घेतले, हे सर्वसामान्य जनतेला आणि भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाही पटलं नाही. हेच लोकसभेच्या निकालात दिसून आलं, असेही रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news