पुढच्या १० वर्षात विकासाचा नवा अध्याय रचणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुढच्या १० वर्षात विकासाचा नवा अध्याय रचणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन एनडीए हा भारताचा आत्‍मा आहे. सुशासन आणि एनडीए हे समानार्थी शब्‍द आहेत. सरकार चालवण्यासाठी बहुमताची गरज असते. सरकार चालवण्यासाठी सर्वांची सहमती गरजेची आहे. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्‍न केले आहेत. एनडीए देशाला प्रगतीच्या मार्गावर नेणार असून, पुढच्या १० वर्षात विकासाचा नवा अध्याय रचणार असल्‍याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्‍त केला. नवनिर्वाचित खासदार आणि एनडीए पक्षातील नेत्यांची बैठक आज जुन्या संसद भवनाच्या सेट्रल हॉलमध्ये आयोजित केली होती. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीए नेतेपदी निवड होत असल्याची घोषणा आज (दि.७ जून) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी केली. यावेळी आपल्‍या भाषणात ते बोलत होते.

एनडीएची युती ही सर्वात यशस्‍वी युती

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी हा क्षण माझ्यासाठी भावूक असल्‍याचे सांगितले. जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला. एनडीएवर विश्वास दाखवला आहे. गरिबांचं कल्‍याण आमच्यासाठी केंद्रस्‍थानी आहे. २२ राज्‍यातील लोकांनी NDA ला सेवा करण्याची संधी दिली आहे. एनडीएला ३ दशक पूर्ण होणे हा मजबुतीचा संदेश आहे. देश आणि माझ्यात विश्वासाचं नातं आहे. राष्‍ट्र प्रथम ही आमची मुळ भावना आहे. जनता आणि शासन यांच्यामध्ये एक दरी निर्माण झाली होती. ती आम्‍ही मिटवण्याचा प्रयत्‍न केला.

देशाला सध्याच्या स्‍थितीत फक्‍त NDA वर विश्वास

पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्‍ला केला. भारताच्या लोकशाहीचा विरोधकांनी अपमान केला. निकालाआधीपासून विरोधकांनी हिंसेची भाषा केली. योजनापूर्ण देशाला हिंसेच्या आगीत झोकण्याच काम केलं गेलं. मात्र EVM ने विरोधकांना शांत केलं. ईव्हीएम जिवंत आहे की मेलं? असा प्रश्न मोदींनी विरोधकांना केला. १० वर्षानंतरही काँग्रेस १०० जिकली नाही. ४ जून नंतर तर विरोधकांची वागणूक विचित्र झाली आहे. मात्र देशाला सध्याच्या स्‍थितीत फक्‍त NDA वर विश्वास असल्‍याच त्‍यांनी सांगितलं.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news