Vinod Tawde : विधानसभेचे तिकीट नाकारलेले विनोद तावडे राष्ट्रीय स्तरावर महत्वाच्या भूमिकेत…

एनडीएच्या  समन्वयकपदी   विनोद तावडे यांची निवड केली आहे.
एनडीएच्या समन्वयकपदी विनोद तावडे यांची निवड केली आहे.

[author title="प्रशांत वाघाये " image="http://"][/author]

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदींची उमेदवारी असलेली पहिली यादी जाहीर करणे, भाजपच्या जाहीरनामा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, एनडीएला मिळालेल्या तिसऱ्या मोठ्या विजयानंतर भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील सगळ्या महत्त्वाच्या बैठका, एनडीएच्या घटक पक्षांमध्ये समन्वयक या सर्वांमध्ये एक 'मराठी' नाव कायम आढळून आले, ते म्हणजे विनोद तावडे. (Vinod Tawde)

विनोद तावडे यांचे राजकीय अस्तित्व संपेल की काय?

  • २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी नाकारली गेली.
  • राज्याच्या राजकारणातून काहीसे बाहेर फेकले गेले.
  • त्यानंतर  जबरदस्त कमबॅक करत दिल्लीच्या राजकारणात  जम बसवला.

Vinod Tawde : बिहारचे प्रभारी म्हणून जबाबदारी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ज्या विनोद तावडेंचे राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी नाकारली गेली. त्यानंतर विनोद तावडे  राज्याच्या राजकारणातून काहीसे बाहेर फेकले गेले. पुढे विनोद तावडे यांचे राजकीय अस्तित्व संपेल की काय?, अशा शक्यता अनेकांना दिसू लागली. मात्र, विनोद तावडे यांनी जबरदस्त कमबॅक केले. भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटनेत राष्ट्रीय सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती केली. देशातील बिहारसारख्या संवेदनशील, पक्षाला प्रतिकूल आणि महत्वाचे राज्य असलेल्या बिहारचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली. या सर्व जबाबदाऱ्या दिल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या राजकारणात चांगलाच जम बसवला. आणि ते पक्षनेतृत्वाच्याही जवळ पोहोचले.

भाजपच्या सर्व महत्त्वाच्या बैठकांमध्ये तावडे यांचा  सहभाग

भाजपच्या सर्व महत्त्वाच्या बैठकांमध्ये तावडे यांची ऊठबस दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विविध कार्यक्रमांचे सूक्ष्म नियोजन, महत्त्वाच्या गोष्टींसह विविध महत्त्वाच्या सभांचा आढावा याची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजपमध्ये झालेले अनेक पक्षप्रवेश हे त्यांच्या उपस्थितीत झाले.  त्यांना २०१९ मध्ये  विधानसभेची उमेदवारी नाकारली गेली होती, आता त्यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य नाव असलेली भाजपची पहिली लोकसभेची यादी जाहीर केली.

Vinod Tawde : सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी समन्वयक म्हणून निवड

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ज्या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी पक्ष मुख्यालयात आले. त्या सर्व कार्यक्रमांचे सूत्रधार हे विनोद तावडेच आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी देशाच्या बहुतांश भागात दौरे केले. देशात तिसऱ्यांदा एनडीए सरकार येत आहे. आता एनडीएमध्ये असलेल्या सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी समन्वयक म्हणूनही  त्यांचीच निवड करण्यात आली आहे. तावडे आजघडीला आमदार किंवा खासदार नाहीत. आमदारकी, खासदारकी मिळवण्यासाठी तावडेंनी कधी फिल्डिंगही लावली नाही. मात्र, ते आता आणखी नव्या भूमिकेत दिसू शकतात.

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सरकार स्थापन करत असलेल्या भाजपमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. देशासह राज्यातही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. महाराष्ट्रत तर भाजपला केवळ ९ जागा मिळाल्या. यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी 'मला सरकारमधील जबाबदारीतून मोकळे करा,' अशी विनंती पक्ष नेतृत्वाकडे केली आहे.  फडणवीस पक्षाच्या संघटनेत आणि विधानसभेच्या तयारीत लक्ष घालू इच्छित आहेत. अर्थात, यावर अंतिम निर्णय भाजपमधील शीर्ष नेतृत्व घेणार आहे.

Vinod Tawde : एनडीएच्या सरकार -३ स्थापनेनंतर महत्वाची जबाबदारी मिळणार

मात्र,  या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये काही ठिकाणी मोठे बदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात यापूर्वी एनडीएतील महत्वाच्या घटकपक्षांना सोबत घ्यायचे असेल.  किंवा लोकसभा निवडणुकीत अडचणीची ठरलेली समीकरणे दुरुस्त करायची असल्यास तावडे यांच्याकडे  राज्याचा दृष्टीने महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यावर सध्या भाजपमध्ये मंथन सुरू असल्याचे समजते. मात्र, फडणवीस यांच्या 'मला सरकरमधून मोकळे करा' या वक्तव्यानंतर  तावडे यांची चर्चा भाजपमध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही होत आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news