मालाड, पुढारी वृत्तसेवा : मालाड आणि कांदिवलीत दोन दिवसांत दोन घरांचा काही भाग कोसळून तीन जण जखमी झाले. मुसळधार पावसाने मालवणीतील कलेक्टर कंपाऊंड, प्लॉट नंबर ४४ मधील अचानकपणे एक मजली घराचा काही भाग आज (दि. 29) दुपारी कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर शुक्रवारी (दि.२८) मध्यरात्री एकतानगर कांदिवली पश्चिमेत एका दुमजली जुन्या घराचा लोखंडी अँगल तुटून काही भाग कोसळला. यात घरात भाडे तत्वावर राहणारे ३ जण किरकोळ जखमी झाले.
जखमींची नावे कळू शकलेली नाही. माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, २ वर्षापूर्वी मालवणी नवीन कलेक्टर कंपाऊंडमधील दोन मजली घर जुलै महिन्यात पडून १२ जण दगावली होते. त्यात एकाच कुटुंबियातील ९ लोकांचा समावेश होता.
हेही वाचा