मुंबई – पुणे हायवेवर आजही मेगाब्लॉक ! मुंबईकडे जाताना या मार्गाचा करा वापर | पुढारी

मुंबई - पुणे हायवेवर आजही मेगाब्लॉक ! मुंबईकडे जाताना या मार्गाचा करा वापर

पुढारी ऑनलाईन : सोमवारी आणि गुरुवारच्या मेगा ब्लॉकनंतर आज मुंबई – पुणे हायवेवर पुन्हा एकदा दोन तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे. काल रात्री पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरील कामशेत बोगद्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुन्हा एकदा दरड कोसळण्याची घटना घडली. त्यामुळे मुंबईकडे जाणारे रस्त्यावरील एक लाईन बंद झाली होती.

या मेगा ब्लॉकमध्ये ही दरड हटविण्याचे काम केले जाणार आहे. आज दुपारी 2 ते 4 दरम्यान मुंबईकडे जाणारी सगळी वाहतूक किवळेपासून वळवली जाणार आहे. किवळे येथून जुन्या महामार्गाने वाहतूक वळवली असून पुन्हा खंडाळा घाटात नवीन महामार्गावर वाहतूक सोडण्यात येणार आहे. दरड हटविण्याच्या या कामादरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून कामशेत बोगदा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे. या दरम्यान पुण्याकडे येणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरू राहील.

हेही वाचा :

येत्या 24 वर्षांत पुणे शहराची लोकसंख्या एक कोटीवर

पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस

Back to top button