HBD Sanjay Dutt : संजय दत्त मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात कसा अडकला? | पुढारी

HBD Sanjay Dutt : संजय दत्त मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात कसा अडकला?

पुढारी ऑनलाईन डेस्क : १९९३ च्या बॉम्बस्फोटात जेव्हा संजय दत्तचे नाव समोर आले होते, तेव्हा त्याचे वडील आणि दिवंगत अभिनेता सुनील दत्त य़ांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला. यासिर उस्मानचे पुस्तक ‘द क्रेजी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलीवुड्स बॅड ब्वॉय संजय दत्त’मध्ये या प्रसंगाचा उल्लेख आला आहे. संजू या चित्रपटातदेखील यासंदर्भात उल्लेख आला आहे. (HBD Sanjay Dutt ) ब्लॉकबस्टर चित्रपट खलनायक १५ जून, १९९३ रोजी रिलीज झाला होता. त्याचवेळी मुंबईत सीरियल बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात संजय दत्तचेदेखील नाव समोर आले होते. १९९३ मध्ये तेरा बॉम्बस्फोटाने मुंबई हादरली होती. या हल्ल्यात दाउद इब्राहिम, मेमन आणि नंतर संजय दत्तचे नाव समोर आले होते. (HBD Sanjay Dutt)

खलनायक चित्रपटाच्या रिलीजच्या दोन महिने आधी १२ मार्च, १९९३ रोजी मुंबईत बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात २५७ लोकांचा जीव गेला आणि ७१३ लोक गंभीर जखमी झाले होते. निष्पाप जीव गेले, शेकडो जखमी झाले आणि करोडो रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. जेव्हा या बॉम्बस्फोटाचा तपास सुरु झाला तेव्हा दाऊद इब्राहिम, त्याचा भाऊ अनीस इब्राहिम, टायगर मेमन आणि अबू सालेम सासारख्या कुविख्यात्यांचं नाव समोर आलं होतं.

मुंबई ब्लास्टनंतर पोलिस षड्यंत्र रचणाऱ्यांच्या शोधात लागली. तेव्हा पोलिसांना समजले की, यामध्ये बॉलीवूडचे काही लोक समाविष्ट आहेत. संशयाच्या आधारावर पोलिसांनी प्रोड्यूसर हनीफ कडावाला आणि समीर हिंगोराला चौकशीसाठी बोलावले. त्यावेळी संजय दत्त चित्रपट ‘सनम’मध्ये काम करत होता. पण, सर्वात धक्कादायक हे होतं की, एका अभिनेत्याचे संजय दत्तचे नाव या स्फोट प्रकरणात समोर आले.

असंही म्हटलं गेलं- ”हनीफ कडावालाच्या चौकशीवेळी तो उत्तरे देण्यास टा‍ळाटा‍ळ करू लागला. परंतु, पोलिसांसमोर त्याचे काही चालले नाही. त्याने पोलिसांना सांगितले की, ‘पोलिस नेहमी आमच्यासारख्या छोट्या माशांना त्रास देतात, मोठे लोग तर बिनधास्त फिरतात.’

मीडिया रिपोर्टनुसार, अबू सालेम जानेवारी, १९९३ मध्ये अंडर वर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या म्हणण्यानुसार गुजरातला गेला. तेथून ९ एके-५६ रायफल, १०० हँड ग्रेनेड आणि गोळ्या घेऊन मुंबई आला. ही सर्व हत्यारे आणि स्फोटके थेट संजय दत्तच्या घरी नेण्यात आले होते. अबू सालेमने २ एके-५६ रायफले आणि २५० गोळ्या ठेवल्या होत्या. त्याने संजय दत्तच्या घरातून ती हत्यारे उचलली.

संजयचे वडील सुनील दत्त यांनी भावनेच्या आहारी न जाता कारवाईसाठी पोलिसांना सहकार्य केलं. तेव्हा संजय दत्त परदेशात होता. सुनील दत्त यांनी आपल्या मुलाला भारतात बोलावले.

त्यावे‍ळी संजय मॉरीशसमध्ये ‘आतिश’चे शूटिंग करत होता. शूटिंग संपताच तो मुंबईत परतला. एप्रिल १९९३ मध्ये संजय दत्तला तेथे अटक करण्यात येऊन विमानतळावरून थेट मुंबई क्राईम ब्रँच नेण्यात आले. चौकशीत संजय दत्तने कबूल केलं की, त्याच्याकडे एके-५६ आहे. नोव्हेंबर २००६ मध्ये पिस्तुल आणि एके-५६ रायफल बाळगल्याप्रकरणी तो दोषी ठरला.

संजय दत्त ठरला दोषी 

रिपोर्टनुसार, नोव्हेंबर, २००६ मध्ये मुंबईच्या टाडा कोर्टाने निर्णय देत संजय दत्तला दोषी ठरवलं. सहाशे लोकांनी साक्ष दिली आणि पुराव्याच्या आधारे याकूब मेमन, संजय दत्तसह १०० लोकांना दोषी ठरवलं गेलं. २३ लोकांना निर्दोष सोडण्यात आलं होतं. नंतर सुप्रीम कोर्टाने देखील अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला दोषी ठरवून ५ वर्षाची सुनावली होती.

Back to top button