

मुरुड जंजिरा : मुरूड पद्मदुर्ग जागर व गड भ्रमण सामाजिक संस्था, कोकण कडा मित्र मंडळ रायगड व सर्व संलग्न शिवप्रेमी संस्थांच्या वतीने पद्मदुर्ग सोहळा रविवार, 11 जानेवारी रोजी पद्मदुर्ग किल्ला संपन्न होणार आहे. राज्याचे मत्स्य उद्योग, बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा आवाज पद्मदुर्ग किल्लात धडाडणार आहे.
या कार्यक्रमावेळी खासदार सुनील तटकरे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, तहसीलदार आदेश डफल, बंदर निरीक्षक प्रमोद राऊळ, मुरूड जंजिरा नगरपरिषद मुख्याधिकारी सचिन बच्छाव, पुरातत्व विभागाचे अधिकारी बजरंग येलेकर, पोरहित प्रकाश स्वामी जंगम, पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, मुरूड पद्मदुर्ग जागर व गडभ्रमण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आशिलकुमार ठाकूर, राहुल कासार, कोकण कडा मित्र मंडळ रायगड-शेखर मामा फरमन, उपाध्यक्ष संकेत वडके, सुरेश पवार, अनिकेत कदम, प्रकाश दाभेकर आदिंसह शिवप्रेमी उपस्थित असणार आहेत.
मुरूड पद्मदुर्ग जागर व गडभ्रमण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आशिलकुमार ठाकूर यांनी सांगितले की स्वाभीमानाचा पद्मदुर्ग जागर एक दिवस इतिहासाचा पद्मदुर्ग जागर सोहळा गेली 17 वर्ष पद्मदुर्ग किल्ल्यात करत आहोत जेणेकरून या कार्यक्रमातून शासनाला जाग येईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्लाचे संवर्धन व जतन होईल हाच मुख्य हेतू हा कार्यक्रम घेण्याचा आहे. शासनाने जागे होऊन पद्मदुर्ग किल्ला कडे लक्ष द्यावे. येणाऱ्या 11 जानेवारी रोजी पद्मदुर्ग जागर सोहळा संपन्न होणार आहे.
सकाळी 6 वाजता राधाकृष्ण मंदिर ते जेट्टीपर्यत पालखी प्रस्थान सकाळी 7 ते 8 वाजता होणार आहे. त्यानंतर गड स्वच्छता, गड सजावट, गड पूजन , गडदेवता कोटेश्वरी माता पूजन, छत्रपती श्री शिवाजी महाराज प्रतिमा अभिषेक व पूजन, व्याख्यान, मर्दानी खेळ, गडकोट शिवपालखी सोहळा, श्री कोटेश्वरी माता दर्शन व आरती दुपारी महाप्रसाद, गड स्वच्छता करणार केली जाणार आहे. शिवप्रेमींनी डोंगरी येथील खोरा बंदरा जवळ येथे उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.