Online Task Fraud: ऑनलाईन टास्क फसवणुकीने घेतला विद्यार्थ्याचा जीव; मुख्य आरोपी मध्य प्रदेशातून अटकेत

जोगेश्वरीतील 17 वर्षीय विघ्नेश चौगुले आत्महत्येप्रकरणी कारवाई; अंधेरी रेल्वे पोलिसांची कारवाई
Online Task Fraud
Online Task FraudPudhari
Published on
Updated on

मुंबई : ऑनलाईन टास्क फसवणुकीनंतर विघ्नेश निलेश चौगुले या सतरा वर्षांच्या मुलाच्या आत्महत्येप्रकरणी हरिश ऊर्फ बिनोद सूर्यवंशी या आरोपीस अंधेरी रेल्वे पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली. त्याच्याविरुद्ध विघ्नेशची फसवणूक करुन त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असून याच गुन्ह्यांत त्याला स्थानिक न्यायालयाने मंगळवार 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लोंढे यांनी सांगितले.

Online Task Fraud
LPG shortage |गॅस तुटवड्यावर विजेची मलमपट्टी..! 'इंडक्शन' वापरणाऱ्या उपाहारगृहांना तामिळनाडूत वीज दरात सवलत

विघ्नेश हा जोगेश्वरी येथे त्याच्या कुटुंबीयांसोबत राहात होता. तो बारावीत शिकत होता. त्याच्या पालकांनी त्याला खासगी क्लासेसमध्ये एक्स्ट्रा क्लास लावला होता. 21 जानेवारी 2025 रोजी तो क्लाससाठी घरातून निघून गेला. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या पालकांनी त्याचा शोध सुरू केला होता. याच दरम्यान त्यांना जोगेश्वरी रेल्वे स्थानकात एका मुलाचा अपघाती मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात नेण्यात आला अशी माहिती समजली होती. त्यामुळे ते सर्वजण तिथे गेले होते. यावेळी त्यांना तो मृतदेह विघ्नेशचा असल्याचे दिसून आले होते. याप्रकरणी त्याचे वडील निलेश गजानन चौगुले यांची जबानी नोंदवून अंधेरी रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती.

Online Task Fraud
Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना फेब्रुवारी, मार्चचा हप्ता 15 एप्रिलपूर्वी एकत्र

या मृत्यूची पोलिसांकडून चौकशी सुरू केली होती. त्याने त्याच्या मोबाईलवर वेगवेगळे सोशल अकाऊंट उघडले होते. पार्टटाईम जॉबच्या नावाने त्याला काही अज्ञात सायबर ठगांनी संपर्क साधून घरबसल्या पैसे कमविण्याचे टास्क दिले होते. ते टास्क पूर्ण केल्यानंतर त्याच्या बँक खात्यात काही रक्कम ट्रान्स्फर करण्यात आली होती. नंतर त्याच्याकडून विविध टास्कसाठी पैसे घेण्यात आले होते. त्यात त्याने 49 हजारांची गुंतवणूक केली होती. मात्र ते टास्क पूर्ण करुनही त्याला पैसे मिळाले नाही. त्यामुळे त्याने लोकलखाली उडी घेऊन स्वत:चे जीवन संपविले होते. ही माहिती नंतर त्याच्या वडिलांना देण्यात आली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित आठ जणांविरुद्ध विघ्नेशला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Online Task Fraud
Mumbai Pune Missing Link: मिसिंग लिंक 1 मेपासून सुरू होणार; अखेरचा पूल पूर्ण

तपासात बिनोद सूर्यवंशी याचे नाव समोर आले होते. तो राजस्थानचा रहिवासी होता. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लोंढे यांचे एक विशेष पथक तिथे पाठविण्यात आले होते. मात्र त्याला चोरीच्या गुन्ह्यांत मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळाली होती.या टीमने मध्य प्रदेशातून बिनोदला पकडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news