Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना फेब्रुवारी, मार्चचा हप्ता 15 एप्रिलपूर्वी एकत्र

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना फेब्रुवारी, मार्चचा हप्ता 15 एप्रिलपूर्वी एकत्र File photo
Published on
Updated on

मुंबई : राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्‍या लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा हप्ता आता एकत्र दिला जाणार असल्याचे वृत्त आहे.

नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 15 एप्रिलपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात एकूण तीन हजार रुपये जमा होणार आहेत. नुकत्याच मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आल्याने हा प्रलंबित लाभ देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जानेवारीच्या हप्त्यानंतर प्रतीक्षेत असलेल्या महिलांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, काही महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा ज्यांच्या अर्जात त्रुटी आहेत, त्यांना दुरुस्तीसाठी 31 मार्च 2026 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतर ज्यांचे ई-केवायसी पूर्ण नसेल किंवा ज्या महिला अपात्र ठरतील. त्यामुळे 15 एप्रिलचा संयुक्त हप्ता मिळवण्यासाठी महिलांना 31 मार्चपर्यंत आपली कागदपत्रे आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news