Mumbai Pune Missing Link: मिसिंग लिंक 1 मेपासून सुरू होणार; अखेरचा पूल पूर्ण

13 किमी प्रकल्पामुळे घाटातील अंतर 6 किमीने कमी; एमएसआरडीसीकडून कामांना वेग
Mumbai Pune Missing Link
Mumbai Pune Missing LinkPudhari
Published on
Updated on

मुंबई : मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प महाराष्ट्र दिनी सुरू करण्याचे नियोजन असून त्यादृष्टीने कामांना वेग देण्यात आला आहे. या प्रकल्पातील अखेरच्या दरीपुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून आता त्याच्या खांबांवर रंगकाम सुरू करण्यात आले आहे.

Mumbai Pune Missing Link
Mumbai PAP Housing Scheme: प्रकल्पबाधितांसाठी ३४,१२९ पीएपी सदनिका; महापालिकेच्या अर्थसंकल्पात ८९० कोटींची तरतूद

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा एकूण 94.5 किमी लांबीचा रस्ता आहे. द्रुतगती महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग 4 हे दोन्ही रस्ते खालापूर टोल प्लाझा येथे एकत्र येतात आणि खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते.

Mumbai Pune Missing Link
Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना फेब्रुवारी, मार्चचा हप्ता 15 एप्रिलपूर्वी एकत्र

त्यामुळे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट या भागात 13 किमीचा मिसिंग लिंक उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) करण्यात येत आहे. मिसिंग लिंक उभारण्याचे काम 2019 साली सुरू करण्यात आले होते.

Mumbai Pune Missing Link
Bombay High Court: मानव तस्करी प्रकरणात साक्ष नोंदवण्यास विलंब; उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाला सुनावले

सध्या ज्या परिसरात मिसिंग लिंक उभारला जात आहे तो भाग द्रुतगती मार्गावरून पार करताना लोणावळा आणि खंडाळा घाट ओलांडावा लागतो. नागमोडी वळणांमुळे हे अंतर 19 किमीचे आहे. मिसिंग लिंकमुळे हा प्रवास 6 किमीने कमी होईल. शेवटच्या 650 मीटरच्या केबल स्टेड पुलाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. त्याची जोडणी आता पूर्ण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news