Mumbai | मुंबईत इमारतीची बाल्कनी कोसळली, १ महिला ठार, ५ जखमी

ग्रँड रोड परिसरातील घटना
Mumbai
मुंबईतील ग्रँड रोड परिसरात रुबिना मंझील इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळण्याची घटना घडली.pudhari photo

पुढारी ऑनलाईन डेस्क

मुंबईतील (Mumbai) ग्रँड रोड परिसरात रुबिनिसा मंझील नावाच्या इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळण्याची घटना घडली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर पाच जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिची बीएमसीने दिली आहे. हे चारही जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले होते. त्यांच्याकडून बचावकार्य करण्यात आले.

Mumbai
Mumbai Rain : तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला

लोकांना इमारतीतून सुखरूप बाहेर काढले

चार मजली रुबिनिसा मंझील इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीसह काही भाग सकाळी कोसळला. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी इमारतीत सुमारे ३५-४० लोक होते. या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळावरील काही फोटोंमध्ये स्थानिक लोक काँक्रीटच्या स्लॅबखाली अडकलेल्या एका व्यक्तीला वाचवताना दिसत आहेत.

Mumbai building collapsed
ग्रँड रोड परिसरात कोसळलेल्या इमारतीच्या ठिकाणी ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे.Pudhari photo

इमारत धोकादायक स्थितीत

दरम्यान, इमारतीचा पुढचा काही भाग अंधातरी अवस्थेत लटकत आहे. यामुळे तो कधीही कोसळू शकतो. अग्निशमन दलासह पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी हजर आहेत. या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि आजूबाजूच्या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहे. या पावसाळ्यातील ही पहिलीच मोठी दुर्घटना आहे.

Mumbai building collapsed
घटनास्थळी बचावकार्य करण्यात आले.Pudhari photo
Mumbai
मुंबईसह कोकणला पावसाचा 'रेड अलर्ट'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news