

Nitesh Rane Controversial Statement On Madrasas: भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी आज पत्रकारांशी बोलताना मालेगावमधील नमाज पठणाच्या वादावर भाष्य केलं. त्याचबरोबर त्यांनी राज्यातील मदशांबाबत देखील मोठं आणि वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते महाराष्ट्रातील मदरसे दहशतवाद्यांचे अड्डे झाले आहेत. मी मुख्यमंत्र्यांकडे सगळे मदरसे बंद करण्याची मागणी करणार आहे असं देखील म्हणाले.
नितेश राणेंनी होळीच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी जलवाहतुकीची सोय केल्याचं सांगत ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची योजना आहे. ही योजना येत्या एक मार्च रोजी सुरू होणार आहे. मुंबई ते विजयदूर्ग असा या जलवाहतुकीचा पहिला टप्पा असणार आहे. येत्या काळात याचे टप्पे अजून वाढवले जातील असं देखील नितेश राणे यांनी सांगितलं.
नितेश राणे यांनी या जलवाहतुकीबाबतची सर्व माहिती वेबसाईटवर आहे. तिकीट बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे असं देखील सांगितलं. त्यांनी वर्सोवा जेट्टी वृक्षतोड वादावर देखील भाष्य केलं. त्यांनी फडणवीस सरकारचा पर्यावरणपूरक विकास हा हेतू आहे. प्रवाशांना कमी त्रास होईल असं काम केलं जाईल. दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल असं देखील ते म्हणाले,
दरम्यान, मालेगावमधील नमाज प्रकरणी देखील नितेश राणे यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी निवडणुकीआधी हे लोक जय भीम जय भीम करतात मात्र निवडून आल्यावर बाबासाहेबांना विसरतात. संविधानात नमाज पठणाला कुठं मान्यता आहे. नमाज पठणाला मशिदी काय बंद होत्या का?
ते पुढे म्हणाले की, 'आम्ही देखील गीता वाचायला सुरूवात करणार मग या हिरव्या सापांनी बोलू नये असं वादग्रस्त विधान देखील त्यांनी केलं. त्यांनी मदरशांबाबत वक्तव्य करताना मदरसे हवेतच कशाला, मदरसे दहशतवादी चालवतात. आम्ही शाळांमध्ये भगवत गीता शिकवू मदरशांचे लाड कशाला करायचे असा सवाल देखील विचारला.
यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील मदरसे दहशतवाद्यांचे अड्डे आहेत सगळे मदरसे बंद करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं देखील ते म्हणाले.