Annual Toll Pass: पथकर नाक्याजवळ राहणाऱ्यांसाठी वार्षिक पास; १ नोव्हेंबरपासून नवी सुविधा

२० किमीच्या परीघातील वाहनांना आकारणार केवळ १५०० ते ३००० रुपये
Annual Toll Pass
Annual Toll PassPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: राष्ट्रीय महामार्गांवरील पथकर नाक्यांजवळ राहणाऱ्या वाहनचालकांना दिलासा देणारा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) घेतला आहे. पथकर नाक्यापासून २० किमीच्या परीघात राहणाऱ्या वाहनचालकांना १ नोव्हेंबरपासून १५०० ते ३००० रुपयांत वार्षिक पास उपलब्ध होणार आहे.

पथकर नाक्यांवरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी फास्टॅगद्वारे संगणकीय पद्धतीने पथकर आकारला जातो. राष्ट्रीय महामार्गांवरून नियमित प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी वार्षिक फास्टॅग पास सुविधा चालवली जाते.

Annual Toll Pass
Jio Platforms Listing: जिओ प्लॅटफॉर्म्‍सची शेअर बाजारामध्ये दमदार एन्ट्री; गुंतवणूकदारांना २१ टक्के लिस्टिंग फायदा

देशभरातील ८५ हजारांहून अधिक वाहनचालकांकडे वार्षिक फास्टॅग आहेत. नव्या योजनेनुसार पथकर नाक्यापासून २० किमीच्या परीघात राहणाऱ्या वाहनचालकांना विशेष पासची सुविधा मिळणार आहे.

Annual Toll Pass
Maharashtra Cooperative Elections: दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील सहकार निवडणुका लांबणीवर

नगरपालिका किंवा शहराच्या हद्दीबाहेरील पथकर नाक्यांसाठी १५०० रुपयांत वार्षिक पास मिळणार आहे. तसेच नगरपालिका किंवा शहराच्या हद्दीत असणाऱ्या पथकर नाक्यांसाठी ३००० रुपयांत वार्षिक पास मिळणार आहे.

येत्या रविवारपासून म्हणजेच १ नोव्हेंबरपासून ही सुविधा लागू होणार आहे. बिगरव्यावसायिक वाहनधारकांनाच या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. सध्या उपलब्ध असलेला वार्षिक पास किंवा स्थानिक सवलतीचा पास यापैकी एकच पास वाहनधारकांना मिळू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news