पुढारी ऑनलाईन डेस्क : रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांची भारतासह आशियात सर्वांत श्रीमंत म्हणून ओळख आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे एकापेक्षा एक लग्झरी गाडयांचे कलेक्शन आहे. त्यांच्याकडे २ रोल्स रॉयल असून आता त्यांच्या ताफ्यात तब्बल १३.१४ कोटींची नविन कार सामिल झाली आहे. अलिकडेच त्यांनी नविन 'कलिनन' रोल्स रॉयसचे स्वागत केले.
रोल्स रॉयल आपल्या ग्राहकांच्या पसंतीनुसार आणि मागणीप्रमाणे कार बनवते. यामूळेच या कार अतिशय महागडया आहेत. मुकेश अंबानींची ही कार तब्बल १३.१४ कोटींची असून १ कोटी खर्च फक्त पेंन्ट करण्यावर झाला आहे. मुकेश अंबानी याच्या सिक्युरिटीसारठी AMG आणि MG Gloster सह ही रोल्स रॉयस बनवण्यात आली आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, रोल्स रॉयसची किंमत १३.१४ कोटी असून याचे बेस मॉडेल हे ६.८ कोटीपासून सुरू होत आहे.
मुकेश अंबानी यांनी या कारला टस्कन कलरसह विविध शेड्समध्ये ही कार पेंन्ट करण्यात आली आहे. हा रंग इतर रंगांच्या तुलनेत उठून दिसतो. तर या रोल्स रॉयसच्या पेंन्टसाठी तब्बल १ कोटी इतका खर्च झाला आहे.
मुकेश अंबानी यांनी कलिनन या रोल्स रॉयसचा नंबर '०००१' असा आहे. VIP नंबरसाठी ४ लाख रूपये द्यावे लागतात. परंतु या सिरीजचे नंबर सद्या बंद आहेत. यामूळे या नंबरसाठी त्यांना १२ लाख देवून हा नंबर रजिस्टेशन करावा लागला.
मुकेश अंबानी यांच्याकडे १६८ लग्झरी कारचे कलेक्शन असून यामध्ये रोल्स रॉयस, ॲस्टन मार्टिन, बेंटले, या कारर्स आहेत. तर मुकेश अंबानी यांच्याकडे ३ रोल्स रॉयस आहेत. तर आता कलिनन ही नविन रोल्स रॉयस त्यांच्या ताफ्यात दाखल झाली आहे.
हेही वाचा