

Navnath Ban Controversy: भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्याविषयी सोशल मीडियावर खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि बदनामीकारक पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर क्रमांक 0052/2026 अंतर्गत १७ जुलै २०२६ रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 319(2), 356(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे.
भाजपचे सोशल मीडिया सहसंयोजक निखिल भामरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नवनाथ बन यांचे नाव, छायाचित्र आणि भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते म्हणून असलेली ओळख वापरून फेसबुक, इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह, दिशाभूल करणाऱ्या आणि बदनामीकारक पोस्ट प्रसारित करण्यात आल्या. या पोस्टद्वारे बन यांची प्रतिमा मलिन करण्याचा, समाजात त्यांच्याविषयी गैरसमज निर्माण करण्याचा आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
एफआयआरमध्ये १४ वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून, या अकाउंट्सवरून संबंधित पोस्ट प्रसारित झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित अकाउंटधारकांची ओळख पटविणे, डिजिटल पुरावे गोळा करणे आणि पोस्टचा उगम शोधण्याचे काम महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सुरू केले आहे.
या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र सायबरकडे असून, नियुक्त तपास अधिकाऱ्यांकडे पुढील तपास सोपविण्यात आला आहे. तपासात आणखी तथ्ये समोर आल्यास संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
1. गजाभाऊ (Facebook)
2. रोखठोक(Facebook)
3. एक कोटी पवार समर्थक (Facebook)
4. The Voice (Facebook)
5. Mi Punekar – मी पुणेकर (Facebook)
6. Dilip Chavan (Facebook)
7. Hema Pimple (Facebook)
8. shivrajbangarpatil_official (Instagram)
9. sumeshdive (Instagram)
10. siddharthabobade (Instagram)
11. radioactive_dinesh (Instagram)
12. Ganesh Borhade Patil (Instagram)
13. गद्दार रिक्षावाला(Instagram)
14. Sandeep Udmale (Instagram)