Girish Mahajan Fake Photo | मंत्री गिरीश महाजन यांच्या बनावट फोटोप्रकरणी गुन्हा दाखल

आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर प्रसारित
Girish Mahajan
Girish MahajanPudhari
Published on: 
Updated on: 

Girish Mahajan Fake Photo

जळगाव : राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनावट फोटो तयार करून त्यासोबत आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशन, जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर पोलीस स्टेशन, जळगाव येथे गुन्हा क्रमांक 17/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम 356, 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(C) व 67 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Girish Mahajan
Jalgaon News | टोल नाक्यावरील दुर्दशेमुळे दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात; महिनाभरातच उखडले दुरुस्तीचे काम

प्राथमिक माहितीनुसार, एका फेसबुक खात्याद्वारे मंत्री गिरीश महाजन यांचे AI तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार केलेले अथवा मॉर्फ केलेले फोटो वापरून बदनामीकारक आणि आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यात आल्या. याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सतीश गोरडे करीत असून संबंधित आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच सोशल मीडियावर कोणतीही माहिती किंवा छायाचित्रे प्रसारित करण्यापूर्वी त्यांची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news