Navi Mumbai BJP ticket: नवी मुंबई भाजपाच्या तिकीट वाटपावर कार्यकर्त्यांत असंतोष

निष्ठावानांना डावलून बाहेरच्यांना तिकीट दिल्याचा आरोप
BJP campaign
BJP campaignfile photo
Published on
Updated on

नवी मुंबई : नवी मुंबई भाजपामध्ये तिकीट वाटपावरून प्रचंड असंतोष उसळला आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्यांना आणि वादग्रस्त व्यक्तींना तिकीट दिल्याचा गंभीर आरोप तिकीट न मिळाल्यामुळे अपक्ष शिंदेसेना व राष्ट्रवादीमधून लढणाऱ्या उमेदवारांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. भाजपाचे पदाधिकारीच इतर पक्षांचा प्रचार करत असल्याचा आरोप करत नेतृत्त्व यावर कारवाई करणार का, असा थेट सवाल देखील नाराज उमेदवारांनी यावेळी उपस्थित केला.

BJP campaign
Navi Mumbai Municipal Election: नवी मुंबईत तुझे–माझे जमेना, पण पक्षाचा आदेश मोडवेना!

भारतीय जनता पार्टीच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या समर्थकांना भाजपने तिकिट डावल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे युवा जिल्हा अध्यक्ष दत्ता घंगाळे शिवसेनेच्या तिकिटावर लढत आहेत. तर पांडूरंग आमले हे अपक्ष म्हणून निवडणुकींच्या रिंगणात उतरले ओह. मंगला घरत शिवसेना शिंदे गटातून, जयश्री चित्रे राष्ट्रवादी शरद पवार गटातून रिंगणात उतरल्या आहेत. या उमेदवारांनी भाजपवर संताप व्यक्त केला आहे.

BJP campaign
Mumbai Police Mobile Recovery: यूपीमधून दोन कोटींचे 1650 मोबाईल हस्तगत; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

आमदार मंदा म्हात्रे यांनाही फसवण्यात आल्याचा आरोप करत, विधानसभेच्या निवडणुकीत संदीप नाईक यांचे काम न केल्याचा राग आता तिकीट नाकारून काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाकडून 1000 सदस्य नोंदणी केल्यानंतरच उमेदवारीचा विचार केला जाईल, असे सांगितले जात असताना अनेक निष्क्रिय सदस्यांना थेट तिकीट देण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला.

BJP campaign
Dharavi Redevelopment Project: महापालिका निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन

माजी नगरसेवक मंगला घरत यांनी तर थेट माझा राजकीय खून झाला आहे, असा आरोप केला. जयश्री चित्रे यांनी आरोप केला की, सत्तेसाठी पक्ष बदलणारे लोक एजन्सी नेमून खोटे चित्र रंगवत आहेत. तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर डल्ला मारला गेला आहे. भाजप म्हणजे काय हेच अनेक उमेदवारांना माहीत नाही. नवी मुंबईतून भाजप संपवण्याचाच विडा उचलला आहे का, असा संशय येतो. असाही आरोप त्यांनी केला.

BJP campaign
Thackeray Brothers Joint Rally: शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची ऐतिहासिक संयुक्त सभा

आम्हाला खड्यांप्रमाणे बाजूला सारले!

आम्ही पक्षाचे मूळ आहोत, मात्र आम्हालाच गाफील ठेवले गेले. जिल्हाध्यक्षांनंतरचे महत्त्वाचे पद असतानाही आमच्याशी कुठलीही चर्चा झाली नाही. आम्हाला खड्यांप्रमाणे बाजूला सारले गेले, अशी तीव्र भावना दत्ता घागाळे यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news