

मुंबई : चोरीसह हरविलेले सुमारे दोन कोटींचे 1650 मोबाईल उत्तरप्रदेशातून हस्तगत करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. संबंधित सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी 33 हजार 514 मोबाईल जप्त करुन ते मोबाईल त्यांच्या मालकांना दिले आहेत.
गेल्या काही वर्षांत मुंबई पोलिसांनी मुंबई शहरातून चोरीसह हरविलेले मोबाईल परत मिळविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोबाईलचा शोध घेण्यासाठी सीईआयआर पोर्टलवर नोंद तक्रारीचा राज्य निहाल आढावा घेण्यात आला होता. त्यासाठी तेरा विविध पथकांची नियुक्ती करुन त्यांना उत्तरप्रदेशातील एकोणीस जिल्ह्यांत पाठविण्यात आले होते. या पथकाने 1650 चोरीसह हरविलेले मोबाईल हस्तगत केले असून त्याची किंमत सुमारे दोन कोटी रुपये आहेत. ते सर्व मोबाईल नंतर त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहे.
अशा प्रकारे मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 33 हजार 514 मोबाईल हस्तगत केले आहेत. ही मोहीम आगामी काळात अशाच प्रकारे सुरु राहणार आहे.
दरम्यान, कुठलीही शाश्वती नसताना चोरीसह हरविलेले मोबाईल परत मिळाल्याने या मूळ मालकांनी मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत. याकामी सीईआयआरच्या नोडल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष मदत केल्याचे सांगण्यात आले.
मुंबई ः उत्तरप्रदेशातून हस्तगत करण्यात आलेल्या सुमारे दोन कोटींच्या 1650 मोबाईलसह मुंबई पोलिसांचे पथक.