Nashik Kumbh Mela: उत्तर महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या तरतुदी; रामकाल पथ ते सिंहस्थ कुंभमेळा विकासाला गती

नाशिक ग्रोथ हब, जल माहिती केंद्र आणि नदीजोड प्रकल्पांना मंजुरी; विमानतळ विस्तारालाही चालना
Nashik Kumbh Mela
Nashik Kumbh MelaPudhari
Published on
Updated on

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने पायाभूत सुविधांचा विकास, नाशिकातील जल माहिती केंद्र यांच्यासह विविध नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून अर्थसंकल्पात उत्तर महाराष्ट्रासाठी तरतुदींची घोषणा करण्यात आली आहे.

Nashik Kumbh Mela
Maharashtra AI and IT Department: माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग स्वतंत्र; डिजिटल महाराष्ट्रासाठी नवे धोरण

नाशिक येथे रामकाल पथ विकास प्रकल्पातंर्गत करण्यात येणारी कामे विकास प्रगती पथावर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केले. तसेच, केंद्र शासनाकडून निति आयोगामार्फत देशभरातील निवडक क्षेत्रांच्या आर्थिक वाढीचा रोड मॅप तयार करण्यात येत असून मुंबई महानगरच्या धर्तीवर नाशिक ग्रोथ हब प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याचेही सांगितले. याशिवाय, डिजिटल, प्रमाणित आणि ऑनलाईन, जल संपत्तीची माहिती प्राप्त होण्याकरीता राज्य जल माहिती केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्राची इमारत नाशिक येथे प्रस्तावित असून, या केंद्रासाठी एकूण 71 कोटी 20 लक्ष रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. शिर्डी, नाशिक विमानतळांच्या विस्तारीकरणाची कामे सुरू करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

Nashik Kumbh Mela
Maharashtra Budget 2026: शेतकऱ्यांसाठी चौथी कर्जमाफी जाहीर; फडणवीस सरकारचा 2026-27 चा अर्थसंकल्प विकासाभिमुख

तर, नाशिक व त्र्यंबकेश्वर मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या कुंभमेळ्यानिमित्त देशभरातून आणि परदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक येतील. या कुंभमेळ्याचे सुयोग्य आयोजनासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येत आहे. याअंतर्गत गोदावरी नदी स्वच्छता, त्र्यंबकेश्वर येथे उपसा योजनेद्वारे अमृतस्नान व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मलनि:स्सारण प्रकल्प, घाट सुधारणा व सुशोभिकरण इत्यादी कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच नाशिक विमानतळ, रिंग रोड, रेल्वे स्टेशन व बस स्टेशन इत्यादी पायाभूत सुविधांच्या श्रेणीवर्धनाची कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Nashik Kumbh Mela
Sindhuratna Samruddha Yojana 2.0: कोकणच्या विकासाला नवी चालना; ‘सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0’ची अर्थसंकल्पात घोषणा

नदीजोड प्रकल्प-

दमणगंगा- वैतरणा- गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या 13 हजार 497 कोटी रुपये किंमतीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या 7 हजार 465 कोटी रुपये किंमतीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दमणगंगा- एकदरे - गोदावरी नदी जोड प्रकल्पाच्या एकूण 2 हजार 213 कोटी रुपयांच्या कामास मान्यता देण्यात आली असल्याचेही अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news