Narahari Zirwal controversy : झिरवाळ प्रकरणामुळे राष्ट्रवादी पुन्हा अडचणीत

आक्षेपार्ह चित्रफितीची संख्या वाढली
Narahari Zirwal controversy
Narhari Zirwal Pudhari
Published on
Updated on

मुंबई ः अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या गैरकृत्यांविषयीच्या नव्या चित्रफिती व्हायरल झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत पुन्हा एकदा भर पडली आहे. झिरवाळ हे शासकीय विश्रामगृहात किंवा त्यांच्या बंगल्यावर एका ट्रान्सजेंडरशी अलील वर्तन करत असल्याचा व्हिडिओ अधिवेशन संपत असताना व्हायरल झाला. गुरुवारी या व्हिडिओत नवी भर पडली आहे, आक्षेपार्ह चित्रफितीची संख्या वाढली आहे.

राष्ट्रवादीतील अस्वस्थतेत यामुळे भर पडली असून सरकारच्या प्रतिमेला जपा असा निरोप पुन्हा भारतीय जनता पक्षाकडून येईल काय? या विवंचनेत पक्ष सापडला आहे. झिरवाळ गेल्या दोन दिवसांपासून पक्षनेतृत्वाच्याही संपर्कात नाहीत. त्यांच्या शयनकक्षात काय कृत्ये झाली हे बाहेर येणे त्यांच्याशी संबंधित एखाद्या व्यक्तीचेच काम असावे किंवा या चित्रफिती खोट्या वा तांत्रिक मदतीने केलेल्या असाव्यात या दोनच शक्यता असल्याची चर्चा राष्ट्रवादीत आहे.

Narahari Zirwal controversy
World Marathi Conference Nashik 2026 |'एआय' युगातही अभिजात साहित्याचे मूल्य सर्वाधिक

राष्ट्रवादीत धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे या दोघांना अजित पवार यांच्या हयातीतच आरोपांमुळे मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता. अशोक खरातशी असलेल्या सलगीमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रूपाली चाकणकर यांनाही राजीनामा द्यावा लागला. आता झिरवाळ यांच्या कथित क्लिप्स बाहेर आल्याने खळबळ माजली आहे. झिरवाळ यांचा कर्मचारी कार्यालयातच लाच घेतो हे प्रकरण गाजले होते.

या चित्रफितीबद्दल काँग्रेस आक्रमक आहे. सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांमध्ये आहे. या चित्रफिती खोट्या असतील तर झिरवाळ यांनी पक्ष नेतृत्वाशी संपर्क साधायला हवा होता असेही एका नेत्याने सांगितले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार किंवा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी त्यांचा संपर्क झालेला नाही, रात्री उशिरापर्यंत झिरवाळ कुठे आहेत त्याची कोणतीही माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे नव्हती.

लाचखोरीच्या प्रकरणावेळीच त्यांना घरचा रस्ता दाखवायला हवा होता असे काही नेत्यांचे मत होते.मात्र सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे हे विधान सर्वप्रथम करणारे झिरवाळ हे आदिवासी समाजातील नेते मानले जातात. या प्रकरणाची सर्व माहिती घेऊन कारवाई केली जाईल असे समजते.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्रिमंडळाबाहेर फेकले गेलेले काही नेते कमालीचे अस्वस्थ आहेत. आपल्याला मंत्रिमंडळात घ्यावे असे त्यांना वाटते. त्यांनी या चित्रफिती त्या हेतुने व्हायरल केल्या अशी शंका घेतली जाते आहे. गुरुवारी महत्त्वाचे नेते मुंबईबाहेर असल्यामुळे या संदर्भात कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला अजित पवार यांच्या निधनानंतरचे निर्णय वैध मानू नका असे पत्र पाठवले त्यामळे राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचे मानले जाते.

या व्यक्तीचे अन्य नेत्यांसमवेतही फोटो!

झिरवाळ यांच्या समवेत शयनगृहात असलेल्या त्या व्यक्तीचे अन्य नेत्यांसमवेत असलेले फोटो गुरुवारी व्हायरल झाले आहेत.ट्रान्सजेंडर मंडळावर नेमणूक मिळावी यासाठी ही व्यक्ती नेत्यांना भेटते असेही काही जणांचे म्हणणे आहे. या प्रकाराबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. झिरवाळ यांना आता जाब विचारायला हवा. त्याचवेळी व्हायरल चित्रफितींची सत्यता पडताळून पाहायची गरज आहे काय याबद्दलही राष्ट्रवादीत विचार सुरू आहे. राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांना बदनाम करण्याचे कुभांड तर रचले नाही ना अशी शंकाही व्यक्त केली जाते आहे.

चाकणकर, झिरवाळ प्रकरणांनंतरही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गप्प का?

मुंबई : अशोक खरातच्या अनैतिक दरबारात हजेरी लावणाऱ्या महायुती सरकारमधील डझनभर मंत्र्यांच्या अश्लील कारनाम्याने महाराष्ट्राची नाचक्की झाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला, तर अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. या प्रकरणांनंतरही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गप्प का? असा सवाल प्रदेश काँग्रेसने केला आहे.

एका जबाबदार मंत्र्याने अनैतिक वर्तन करणे संतापजनक आहे. हा प्रकार सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळिमा फासणारा आहे. मंत्रालयातील कार्यालयात भरदिवसा लाच घेताना कर्मचाऱ्यांना अटक केल्याचे प्रकरणही ताजे आहे. झिरवळ यांच्या भोळ्या चेहऱ्यामागे खूप काही दडलेले आहे, असे दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलंब न करता झिरवळ यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

Narahari Zirwal controversy
Sunetra Pawar vs Narhari Zirwal | पक्ष प्रतिमा जपा, प्रशासन बदनामी टाळा !

चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला, तरी त्यांच्याकडे राष्ट्रवादी महिला आघाडीचे अध्यक्षपद कायम आहे. सुनेत्रा पवार यांनी यावर काहीही भाष्य केलेले नाही. त्यांनी या दोघांनाही सर्व पदांवरून मुक्त करावे, असे सपकाळ म्हणाले.

‌‘त्या‌’ व्हिडीओमुळे झिरवाळ अडचणीत; मंत्रिपद धोक्यात?

झिरवाळांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची गुप्त भेट

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर अडचणीत सापडलेले असतानाच आता मंत्री नरहरी झिरवळ यांचाही कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे त्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर झिरवळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली गुप्त भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

या व्हिडीओमध्ये शासकीय निवासस्थानात तृतीयपंथी पवन यादव हा झिरवळ यांच्यासोबत बिछान्यावर बसलेला दिसत आहे. तेथे काही खाद्यपदार्थ आणि मद्याच्या बाटल्याही दिसून येत आहेत. दीड महिन्यापूर्वीच कार्यालयातील लिपिकाने 35 हजारांची लाच घेतल्याने मंत्री झिरवळ चर्चेत आले होते. त्यावेळी विरोधकांनी आरोपांची राळ उठवली होती.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झिरवळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन आपली बाजू मांडल्याचे समजते. या प्रकरणामुळे झिरवळ यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांना राजीनामा द्यावा लागला, तर धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यानंतर मंत्रिपद सोडावे लागणारे झिरवळ हे राष्ट्रवादी अजित पवार गटातील तिसरे मंत्री ठरतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news