Nana Patekar Upcoming Movies: नाना पाटेकरांचे पाच चित्रपट प्रदर्शित होण्याच्या प्रतीक्षेत

‘शक्ती शालिनी’, ‘द कन्फेशन ऑफ मेरी’, ‘कुकू की कुंडली’ आणि ‘वेदांत’ यांचाही समावेश
Nana Patekar
Nana PatekarFile Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: नाना पाटेकर यांच्या निधनानंतरही त्यांचा पडद्यावरील प्रवास थांबणार नाही. त्यांच्या अभिनयाचे पाच चित्रपट अद्याप प्रदर्शित होणे बाकी असून, या चित्रपटांमध्ये भयपट-विनोद, चरित्रपट, गुन्हेगारीपट, प्रेमकथा आदी प्रकारांचा समावेश आहे.

पाच अप्रदर्शित चित्रपट

शक्ती शालिनी : आदित्य सरपोतदार दिग्दर्शित हा मॅडॉक फिल्म्सच्या भयपट-विनोद विश्वातील चित्रपट आहे. यात अनित पड्डा आणि विशाल जेठवा प्रमुख भूमिकेत आहेत. नाना पाटेकर यांनी या चित्रपटातील आपला भाग पूर्ण केल्याचे सांगितले जाते.

ईठा : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चरित्रपट महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. श्रद्धा कपूर, रणदीप हुड्डा, अनंत जोशी आणि नाना पाटेकर यांच्या यात भूमिका आहेत. हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होण्याचे नियोजन आहे.

द कन्फेशन ऑफ मेरी : अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित या गुन्हेगारीपटात नाना पाटेकर फादर बेनेडिक्ट नावाच्या अशा धर्मगुरूची भूमिका साकारत आहेत, ज्यांच्यावर खुनाचा आरोप आहे. या चित्रपटाची टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली होती. मात्र, चित्रपटाचे काही काम अद्याप बाकी असल्याचे समजते.

Nana Patekar
Mumbai Heatwave: ऑक्टोबरमध्येच मुंबई तापली! पारा ३७.६ अंशांवर; मरीन ड्राईव्हवर शुकशुकाट

कुकू की कुंडली : शरण शर्मा दिग्दर्शित या रोमँटिक कॉमेडीमध्ये भुवन बाम आणि वामिका गब्बी यांच्यासोबत नाना पाटेकर दिसणार आहेत. ज्योतिषशास्त्रामुळे एका प्रेमसंबंधात आणि दोन्ही कुटुंबांमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणींभोवती या चित्रपटाची कथा फिरते, असे सांगितले जाते. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

वेदांत : राजेश्वर पांडे राज दिग्दर्शित या चित्रपटात नाना पाटेकर यांच्यासोबत विक्रांत मॅसी, संदीपा धर आणि मुकेश तिवारी यांच्या भूमिका आहेत. तथापि चित्रपटाची कथा, नाना पाटेकर यांची यातील भूमिका आणि प्रदर्शनाची तारीख याबाबत अद्याप फारशी अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

Nana Patekar
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या १० टक्के कायद्याला आव्हान; मुंबई उच्च न्यायालयात नव्याने सुनावणी

या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तसेच, काही चित्रपट पूर्ण झाले आहेत, तर काहींचे उर्वरित काम किंवा अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. नाना पाटेकर यांच्या अभिनयाचे हे चित्रपट त्यांच्या चाहत्यांसाठी रुपेरी पडद्यावरच्या अखेरच्या आठवणी ठरू शकतात.

मृत्यूच्या अहवालाची प्रतीक्षा

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृत्यूप्रकरणी पणजी पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. नानांचा मृत्यू रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच झाल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली.

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू (ब्रॉट डेड) झालेल्या प्रत्येक प्रकरणात पोलिसांकडून अशी नोंद केली जाते. याचा अर्थ मृत्यू संशयास्पद आहे किंवा घातपात झाला आहे, असा होत नाही तर ही एक अनिवार्य कायदेशीर-वैद्यकीय (मेडिको-लिगल) प्रक्रिया आहे. शवविच्छेदन अहवालात मृत्यू नैसर्गिक कारणामुळेच, हृदयविकाराने झाल्याचे स्पष्ट झाल्यावर ही फाईल नियमानुसार बंद केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news