Sleep Competition: ६० दिवस फक्त झोपायचं; अनोखी स्पर्धा जिंकून मुंबईच्या तरुणीने कमावले ९.६ लाखांचे बक्षीस

दिवसभर पुरेशी झोप घेणे आणि त्यासाठी लाखो रुपये मिळवणे, ही कल्पना ऐकायला काहीशी अविश्वसनीय वाटेल. मात्र, मुंबईतील जिनिया चॅटर्जी हिने ही कल्पना प्रत्यक्षात आणली आहे.
Jiniya Chatterjee Wins Rs 9.6 Lakh in Wakefit Sleep Internship
Jiniya Chatterjee Wins Rs 9.6 Lakh in Wakefit Sleep InternshipFile Photo
Published on: 
Updated on: 

Sleep Competition

मुंबई : दिवसभर पुरेशी झोप घेणे आणि त्यासाठी लाखो रुपये मिळवणे, ही कल्पना ऐकायला काहीशी अविश्वसनीय वाटेल. मात्र, मुंबईतील जिनिया चॅटर्जी हिने ही कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. सलग ६० दिवस झोपण्याच्या अनोख्या स्पर्धेत जिनियाने बाजी मारली असून, तिला तब्बल ९.६ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. वेकफिट या कंपनीने आयोजित केलेल्या 'स्लीप इंटर्नशिप'च्या पाचव्या पर्वाची ती विजेती ठरली आहे.

या दोन महिन्यांच्या स्पर्धेत देशभरातील १० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. त्यासाठी तब्बल दोन लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. पुरेशी झोप घेणे, झोपण्याची नियमित वेळ पाळणे आणि दर आठवड्याला दिलेली आव्हाने पूर्ण करणे, असे या स्पर्धेचे स्वरूप होते. स्पर्धकांना ६० दिवसांच्या कालावधीत आपल्या झोपेच्या वेळेची आणि गुणवत्तेची नोंद ठेवावी लागत होती. त्यानुसार त्यांना गुण दिले जात होते.

Jiniya Chatterjee Wins Rs 9.6 Lakh in Wakefit Sleep Internship
Mumbai FDA Diwali Food Safety: ऐन दिवाळीत फराळावर एफडीएचे छापे; मुंबईतील २८ खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे परवाने निलंबित

कशी होती ही स्पर्धा?

मात्र, ही इंटर्नशिप केवळ झोपण्यापुरती मर्यादित नव्हती. स्पर्धकांच्या सर्जनशीलतेची आणि वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने पूर्ण करण्याच्या क्षमतेचीही कसोटी घेतली जात होती. यामध्ये 'स्लीप सिनेमा' या उपक्रमात लोकप्रिय चित्रपटांमधील प्रसंगांना झोपेशी संबंधित अनोखा ट्विस्ट देऊन त्यांची पुनर्निर्मिती करायची होती. तर 'स्लीप बिंगो'मध्ये आठवडाभरातील झोपेच्या सवयींचे परीक्षण करावे लागत होते.

स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात रत्नागिरीचा मणिकंदन

'अंडरकव्हर स्लीप मिशन' हे आणखी एक मजेशीर आव्हान होते. यामध्ये संभाषण सुरू असताना समोरच्या व्यक्तीला संशय येऊ न देता 'ब्लँकेट' किंवा 'पिलो' हे शब्द १० वेळा वापरायचे होते. प्रत्येक आठवड्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्पर्धकाला 'प्रो स्लीपर ऑफ द वीक' हा किताब दिला जात होता.

स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात रत्नागिरीचा मणिकंदन, जिनिया चॅटर्जी आणि मेहेक खोत यांनी पहिल्या तीन स्थानांवर मजल मारली. दरम्यान, हैदराबादचा करीम खान याने साप्ताहिक सर्जनशील आव्हानांमध्ये सर्वाधिक वेळा बाजी मारल्याने त्याला 'वाइल्ड कार्ड' प्रवेश देण्यात आला. त्यामुळे अंतिम फेरीत चार स्पर्धकांमध्ये चुरस रंगली.

'बिग बेड' नाव असलेल्या अंतिम फेरीत काय झालं?

'बिग बेड' असे नाव असलेल्या या अंतिम फेरीचे स्वरूप एखाद्या रिअॅलिटी शोप्रमाणे होते. यामध्ये स्पर्धकांना विविध आव्हानांचा सामना करावा लागला. 'मेमरी फोम चॅलेंज'मध्ये संदर्भासाठी दाखवलेल्या छायाचित्रांनुसार बेडरूमची मांडणी पुन्हा तयार करायची होती. यामध्ये स्पर्धकांची स्मरणशक्ती, निरीक्षणक्षमता आणि सांघिक कामगिरीची परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर 'स्लीप ऑक्शन' हे आव्हान देण्यात आले. यामध्ये झोपण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू मिळविण्यासाठी स्पर्धकांना बोली लावावी लागली. उशा, चादरी, वातानुकूलन यंत्रणेचे नियंत्रण, खोलीतील प्रकाश आणि आवाजाची व्यवस्था अशा गोष्टींचा त्यात समावेश होता. या लिलावादरम्यान सूत्रसंचालक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनुज गुप्ता याने रॅपच्या स्वरूपातील अंगाईगीतही सादर केले.

स्पर्धेतील ती शेवटची रात्र अन्...

झोपण्याची व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर अंतिम फेरीतील स्पर्धकांनी स्पर्धेतील शेवटची रात्र झोपेच्या कामगिरीची नोंद ठेवत घालवली. या रात्री मिळालेल्या झोपेच्या गुणांना विजेतेपद निश्चित करताना विशेष महत्त्व देण्यात आले. अंतिम गुणांची तुलना केल्यानंतर जिनिया चॅटर्जी हिला विजेती घोषित करण्यात आले. तिला ९.६ लाख रुपयांचे बक्षीस आणि प्रायोजित सुट्टी देण्यात आली. दरम्यान, २०१९ मध्ये सुरू झालेल्या या 'स्लीप इंटर्नशिप'ला पहिल्या चार पर्वांमध्ये १० लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. या काळात एकूण ६५ इंटर्नना प्रत्येकी एक लाख रुपयांचे विद्यावेतन देण्यात आले आहे. झोपेला केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात येणाऱ्या या अनोख्या उपक्रमाचे पाचवे पर्वही अशा प्रकारे चर्चेचा विषय ठरले आहे.

Jiniya Chatterjee Wins Rs 9.6 Lakh in Wakefit Sleep Internship
Sindhudurg Navi Mumbai Flight Booking | सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग अधिकृतपणे सुरू; या दिवशी होणार पहिल्या विमानाचे ऐतिहासिक उड्डाण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.