Sindhudurg Navi Mumbai Flight Booking | सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग अधिकृतपणे सुरू; या दिवशी होणार पहिल्या विमानाचे ऐतिहासिक उड्डाण

Sindhudurg Navi Mumbai Flight Booking | 16 नोव्हेंबरला पहिल्या विमानाचे उड्डाण; कोकणवासीयांसाठी आता दररोज विमानसेवा!
Navi Mumbai Airport New Flights
Navi Mumbai Airport New Flightspudhari photo
Published on: 
Updated on: 

कणकवली : पुढारी वृत्तसेवा
सिंधुदुर्ग (चিপি) ते नवी मुंबई विमानसेवेचे तिकीटंचे बुकिंग सुरू झाले असून, येत्या १६ नोव्हेंबर रोजी या मार्गावरील फ्लाई ९१ विमानाचे उड्डाण होणार आहे. विशेष म्हणजे, आता आठवड्यातील सातही दिवस ही विमानसेवा उपलब्ध होणार असल्याने कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Navi Mumbai Airport New Flights
Sindhudurg News : कंदील, पणत्या, रोषणाईने कणकवली बाजारपेठ सजली!

पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या 'एक्स' या सोशल मीडिया माध्यमावर पोस्ट करत ही माहिती दिली. 'येवा, कोकण आपलोच आसा!' असे म्हणत त्यांनी प्रवासी आणि पर्यटकांना या विमानसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग आणि नवी मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ आणि जलद होणार आहे.

Navi Mumbai Airport New Flights
Sindhudurg Accident : कणकवली-मौदे एसटी बस कोसळली खोल दरीत

कोकणवासीया, पर्यटक, व्यावसायिक तसेच मुंबई आणि नवी मुंबईेशी नियमित संपर्क ठेवणाऱ्या नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासोबतच जिल्ह्याची मुंबई महानगर प्रदेशाशी हवाई कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण घडामोड ठरणार आहे.