Mumbai FDA Diwali Food Safety: ऐन दिवाळीत फराळावर एफडीएचे छापे; मुंबईतील २८ खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे परवाने निलंबित

२ हजार ३९६ किलो खाद्यपदार्थांचा साठा जप्त; एका आस्थापनेला व्यवसाय बंद करण्याचे आदेश
Mumbai FDA Diwali Food Safety
Mumbai FDA Diwali Food SafetyPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित, भेसळमुक्त खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईत कारवाई केली आहे. ५ नोव्हेंबर रोजी राबविण्यात आलेल्या मोहिमेत मुंबईतील २८ खाद्य व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर एका आस्थापनेचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले. या कारवाईत मुंबईतून १३ लाख ८७ हजार ८९१ रुपयांचा २ हजार ३९६ किलो खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

नागपाडा येथील ताहुरा स्वीट्स अँड बेकरीमध्ये ४२ किलो मावा अस्वच्छ परिस्थितीत आणि खोलीच्या तापमानात साठवून ठेवल्याचे आढळले. मालाड येथील जेठाराम चुनिराम पुनिया यांच्याकडून १ हजार ४५२ किलो काजू कतली, केसर काजू कतली, विविध मिठाई आणि खजूर बर्फी जप्त करण्यात आली.

Mumbai FDA Diwali Food Safety
Olive Ridley Turtles Konkan: पर्यटनाच्या गजबजाटात दुर्मीळ ‘ऑलिव्ह रिडले’ कासवांचा अधिवास धोक्यात; संख्या ९० टक्क्यांनी घटली

विनापरवाना उत्पादन आणि लेबलशिवाय विक्री केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. वर्सोवा येथील महियार स्वीट अँड स्नॅक्स आणि विलेपार्ले येथील जामनगरी स्वीट्स अँड फरसाण येथे मिठाईमध्ये अतिरिक्त रंगाचा वापर केल्याचे आढळले.

माटुंगा येथील बृजवासी काशिनाथ भगवानदास येथून संशयित निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त करण्यात आला. तसेच गोवंडी, घाटकोपर, कांदिवली, विक्रोळी, मानखुर्द, मलाड आणि इतर परिसरांतील मिठाई दुकाने, डेअरी व खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडूनही साठा जप्त करण्यात आला.

या मोहिमेत टॉसिन पिझ्झा (वरळी), दुर्गा वडापाव सेंटर (खार), नित्यानंद भुवन हिंदू हॉटेल, द मराठा किचन, हॉटेल अन्नपूर्णा, बॉम्बे फरसाण मार्ट, कृष्णा व्ही डेअरी अँड स्वीट्स, बिर्याणी बाय किलो, जंबो बर्गर, ब्लिंक कॉमर्स आणि झेप्टो यांसारख्या आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आलेल्या यादीत आहेत.

Mumbai FDA Diwali Food Safety
Marathwada Water Grid project: मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती; प्रकल्प अहवाल तातडीने सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

गुन्हा दाखल करून एकाला केली अटक

बोरीवली पश्चिम येथील राजधानी बिर्याणी सेंटरचा व्यवसाय अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईतून जप्त करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांमध्ये मावा, काजू कतली, पेढा, लाडू, फरसाण, काश्मिरी मिरची पावडर, बेसन, काजू आणि इतर पदार्थांचा समावेश आहे.

राज्यभरातील प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूविरोधी कारवाईत मुंबईतून २९ हजार २६८ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एक गुन्हा दाखल करून एकाला अटक करण्यात आली असून संबंधित आस्थापना सील करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.