Tenant Verification: मुंबईत 1 ऑगस्टपासून भाडेकरू पडताळणी बंधनकारक; मुंबई पोलिसांचा आदेश

पोलीस उपआयुक्त (ऑपरेशन्स) तथा कार्यकारी दंडाधिकारी अकबर पठाण यांनी हा आदेश जारी केला आहे.
Tenant Verification
Tenant VerificationPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबईतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि दहशतवादी तसेच समाजविघातक घटकांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी महत्त्वाचा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला असून १ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर २०२६ या ६० दिवसांच्या कालावधीत शहरातील सर्व घरमालक, मालमत्ता मालक, हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस व भाडे व्यवसाय करणाऱ्यांना भाडेकरूंची पडताळणी करणे बंधनकारक राहणार आहे.

Tenant Verification
MHT CET Result Viral Video: MHT-CET निकालावर व्हायरल व्हिडीओंनी खळबळ! सीईटी कक्षाची सायबर पोलिसांकडे धाव

पोलीस उपआयुक्त (ऑपरेशन्स) तथा कार्यकारी दंडाधिकारी अकबर पठाण यांनी हा आदेश जारी केला आहे. आदेशानुसार कोणतीही व्यक्ती भाड्याने ठेवण्यापूर्वी तिची संपूर्ण माहिती मुंबई पोलिसांच्या ऑनलाइन Tenant Verification Portal वर नोंदविणे आवश्यक आहे.

परदेशी नागरिकांच्या बाबतीत त्यांचे राष्ट्रीयत्व, पासपोर्ट क्रमांक, व्हिसा तपशील, वास्तव्याचे कारण आणि मुक्कामाचा कालावधी यासह आवश्यक माहिती देणे अनिवार्य करण्यात आले आहे.

Tenant Verification
MPSC Drug Inspector Paper Leak: ‘एमपीएससी’ने पेपरफुटीची चौकशी १५ दिवसांत करावी; रोहित पवार यांची मागणी

मुंबई पोलिसांच्या मते, काही गुन्हेगार आणि समाजविघातक प्रवृत्तीचे लोक खोटी ओळख वापरून किंवा पडताळणी न करता भाड्याने राहतात. अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी हा आदेश लागू करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news