Mumbai Construction Ban: रविवार, सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी बांधकामावर बंदी घाला: वरुण सरदेसाई

Mumbai Construction Ban
Mumbai Construction BanPudhari
Published on
Updated on

मुंबई: रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी बांधकामावर बंदी घालण्याची मागणी वांद्रे पूर्व विधानसभेचे उबाठा आमदार वरुण सरदेसाई यांनी मुंबई महापालिकेने केली आहे. सततच्या गोंगाटामुळे आणि कर्कश आवाजामुळे डोकेदुखी, चिंता, नैराश्य आणि निद्रानाश यासारख्या मोठ्या आरोग्य समस्यांनी नागरिक हैराण असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई शहरात ९१० हून अधिक पुनर्विकास प्रकल्प सुरू आहेत आणि ३,००० हून अधिक बांधकाम स्थळे आहेत. विशेषतः वांद्रे पूर्व मतदारसंघातून आलेल्या तक्रारींमु सरदेसाई यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून रहिवाशांना या कर्कश आवाजातून काहीसा दिलासा मिळावा यासाठी रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी बांधकामावर पूर्ण बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Mumbai Construction Ban
Molestation Case: मोलकरणीचा विनयभंग; आरोपीला हायकोर्टाचा झटका

त्यांच्या या भूमिकेला शहरातील काही रहिवासी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. कानठळ्या बसवणारा आवाज आणि शेजारच्या इमारतींनाही हादरे यामुळे ही मागणी सरदेसाई यांनी सांगितले.

Mumbai Construction Ban
MPSC Syllabus Changes: एमपीएससी परीक्षेच्या अभ्यासक्रमात होणार बदल

या प्रस्तावाला चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशनचे मनदीप सिंग मक्कर आणि कफ परेड रेसिडेंट असोसिएशनच्या अध्यक्ष आणि डॉक्टर असलेल्या लॉरा डिसोझा यांनी समर्थन केले आहे. तसेच वांद्रे येथील नागरिकांनी ही मागणी लावून धरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news