Mumbai Standing Committee President: मुंबई स्थायी समिती अध्यक्षपद उद्या ठरणार; भाजपामध्ये चुरस वाढली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाकडे लक्ष; विरोधक लढणार की माघार घेणार?
Mumbai Municipal Corporation
Mumbai Standing Committee PresidentPudhari
Published on
Updated on

मुंबई : स्थायी समिती भाजपाला मिळण्याची शक्यता असल्यामुळे समितीवर नियुक्ती झालेल्या सदस्यांपैकी अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत भाजपा नगरसेवकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अध्यक्षपदासाठी भाजपा ज्येष्ठ नगरसेवकाचा विचार करणार की, नव्या नगरसेवकाचा विचार करणार हे येत्या बुधवारी स्पष्ट होणार आहे.

Mumbai Municipal Corporation
MMRDA Budget 2026: एमएमआरडीएचा 48 हजार कोटींचा विक्रमी अर्थसंकल्प; तिसऱ्या मुंबईसाठी 4500 कोटींची मोठी तरतूद

स्थायी समितीच्या सदस्यपदी 26 नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात भाजपाच्या 10 नगरसेवकांचा समावेश आहे. यात ज्येष्ठ नेते प्रभाकर शिंदे, गणेश खणकर, राखी जाधव, ॲड. मकरंद नार्वेकर, हरीश भांगिर्डे, शीतल गंभीर, प्रकाश दरेकर, तिवाना सतनाम सिंग, प्रीती सातम व शिवकुमार झा यांचा समावेश आहे. यात गणेश खणकर हे सभागृह नेते झाल्यामुळे त्यांना स्थायी समिती अध्यक्षपद मिळणार नाही. पण समितीच्या अध्यक्षपदासाठी प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर, हरीश भांगिर्डे, शीतल गंभीर, प्रकाश दरेकर यांची नावे चर्चेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवलेल्या नगरसेवकाची समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागेल, असे भाजपाकडून सांगण्यात येत आहे.

Mumbai Municipal Corporation
AI Living Lab Maharashtra: देशातील पहिली ‌‘एआय लिव्हिंग लॅब‌’ महाराष्ट्रात, जर्मनीचे सहकार्य

स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवार 20 फेब्रुवारीला होणार आहे. यासाठी 18 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे 18 फेब्रुवारीलाच स्थायी समितीचे अध्यक्ष कोण, यावर शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून महापौर व उपमहापौर निवडणुकीप्रमाणे विरोधी पक्ष माघार घेणार की उमेदवारी अर्ज दाखल करणार याबाबत अजून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये ठरले नसल्याचे समजते. परंतु ही निवडणूक बिनविरोध करायला ठाकरे सेना तयार होणार नसल्याचे समजते.

Mumbai Municipal Corporation
Sunetra Pawar NCP: सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी; 26 फेब्रुवारीला होणार अधिकृत घोषणा

यामिनी जाधव स्थायी समितीवर

माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांना शिवसेनेने स्थायी समितीचे सदस्यपद दिले आहे. त्यामुळे स्थायी समितीवर यशवंत जाधव यांचे वर्चस्व राहणार असल्याचे बोलले जात आहे.

किशोरी पेडणेकर यांचा पत्ता कट

मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सदस्यपदी विरोधी पक्षनेता म्हणून किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती होणे अपेक्षित होते. मात्र मातोश्रीच्या आदेशानुसार त्यांना समिती सदस्य पदापासून दूर ठेवण्यात आले आहे. पेडणेकर यांच्या विरोधात कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना मुख्य समितीपासून दूर ठेवल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पेडणेकर यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. त्यामुळे स्थायी समितीची जबाबदारी माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यावर राहणार आहे.

Mumbai Municipal Corporation
Nitesh Rane : वने राहिली नाहीत तर वनमंत्री काय कामाचे?

स्थायी समितीतील पक्षनिहाय सदस्य

भाजपा - 10

शिवसेना (उबाठा) - 7

शिवसेना - 4

काँग्रेस - 3

मनसे - 1

एमआयआय - 1

Mumbai Municipal Corporation
Farmer loan waiver: शेतकरी कर्जमाफीच्या दिशेने आणखी एक पाऊल; शासनाने मागविली थकीत कर्जदारांची माहिती, अर्थसंकल्पात घोषणा?

स्थायी समितीत ठाकरे गट

1 श्रद्धा जाधव

2 रमाकांत रहाटे

3 लक्ष्मी भाटिया

4 दीपमाला बडे

5 मीनाक्षी पाटणकर

6 यशोधरा फणसे

7 जगदीश थैवालापिल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news