Kirti Vyas murder case | कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा

कीर्ती व्यास
कीर्ती व्यास
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंधेरीतील बी-ब्लंट सलूनमधील फायनान्स मॅनेजर कीर्ती व्यास यांच्या हत्येप्रकरणी (Kirti Vyas murder case) मुंबईतील सत्र न्यायालयाने मंगळवारी त्यांच्या दोन सहकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अंधेरीतील बीब्लंट सलूनमध्ये काम करणाऱ्या ग्रँट रोड येथील रहिवासी असलेल्या कीर्ती व्यास १६ मार्च २०१८ रोजी कामासाठी घरातून गेल्यानंतर बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह सापडला नव्हता. सहा वर्षांपूर्वी त्यांच्या कुटुंबियांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.

सिद्धेश आणि खुशी दोषी

अभिनेता फरहान अख्तरची पहिली पत्नी अधुना भबानीच्या बी-ब्लंट सलूनची फायनान्स मॅनेजर कीर्ती व्यास हत्याप्रकरणी सत्र न्यायालयाने सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी साहज्वानी या दोघाही आरोपींना सोमवारी दोषी ठरविले. सहा वर्षांपूर्वी घडलेल्या या हत्येप्रकरणी या दोघांना सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे मंगळवारी शिक्षा सुनावली.

सोमवारी सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी सिद्धेश ताम्हणकर आणि एका महिला सहकाऱ्याला भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) इतर कलमांसह खून, हत्येसाठी अपहरण आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवले.

अंधेरीतील बी-ब्लंट सलूनमध्ये ग्रँट रोड येथील २८ वर्षांची कीर्ती व्यास कामाला होती. ती १६ मार्च २०१८ पासून बेपत्ता झाली. दोन महिन्यांनंतर तिच्या हत्याकांडाचे गूढ उकलले. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने ५ मे २०१८ रोजी सिद्धेश व खुशीला अटक केली. दोघांनी कीर्तीचे अपहरण केले आणि धावत्या कारमध्ये गळा दाबून तिची हत्या केली. नंतर वडाळा खाडीत तिचा मृतदेह फेकल्याचे तपासात उघड झाले होते. मात्र, कीर्तीचा मृतदेह अजून सापडलेला नाही.

या खटल्याची न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने सोमवारी दोन्ही आरोपींना दोषी ठरवले होता. तर आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news