

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील बहुचर्चित संदेशखाली महिला लैंगिक शोषण आणि ईडी हल्ला प्रकरणातील आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचा निलंबित नेता शाहजहान शेख याच्यासह सहा जणांविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे.
संदेशखाली महिला लैंगिक शोषण आणि ईडी हल्ला प्रकरणी सीबीआयने सोमवारी विशेष न्यायालयात आरोपपकत्र दाखल केले. ५ जानेवारी २०२४ रोजी कोट्यवधी रुपयांच्या शिधावाटपाच्या संदर्भात शेख यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी ईडीचे पथक संदेशखाली येथे गेले होते. यावेळी जमावाने या पथकावर हल्ला केला होता. या घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या राज्याच्या माजी अन्न पुरवठा मंत्री ज्योती प्रिया मल्लिक यांच्याशी कथित घनिष्ठ संबंध असल्याने शहाजहान शेखला अटक करताना झालेल्या हल्ल्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली हेती.
शाहजहान शेखला तत्काळ अटक करा, असा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिला होता. यानंतर पश्चिम बंगाल सरकारने शेखला २९ फेब्रुवारी २०२४ रोजी अटक केली होती. सीबीआयने ६ मार्च २०२४ रोजी ताब्यात घेतले होते.
पश्चिम बंगालमधील २४ उत्तर परगणा जिल्ह्यातील संदेशखाली गावात काही महिलांवर सामूहिक अत्याचार तसेच गरिबांची जमीन बळकावण्याचे प्रकार झाल्याचा आरोप आहे. यावरून राज्यात सत्तारूढ तृणमूल काँग्रेस तसेच विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या प्रकरणी दाखल याचिकांवरील काेलकाता उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी न्यायालयाने आरोपीवर कारवाईस झालेल्या दिरंगाईबाबत सरकारला फटकारले होते. तसेच या प्रकरणी चार वर्षांपूर्वी राज्य पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासालठी चार वर्षे लागली आहेत," असेही न्यायालयाने सुनावले होते.
हेही वाचा :