Mumbai LPG Shortage: मुंबईतील हॉटेल्सच्या मेनूमध्ये कपात; मंत्रालयातील कॅन्टीनही होणार बंद

मुंबईत 20% हॉटेल्स बंद; आठवडाभरात 50% हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
मंत्रालया
मंत्रालयाPudhari
Published on
Updated on

मेनूमध्ये कपात

मुंबईतील हॉटेल संघटना ‌‘आहार‌’च्या म्हणण्यानुसार सध्या 20 टक्के हॉटेल्स आणि रेस्टॉरंट एलपीजीच्या तुटवड्यामुळे बंद करण्यात आली आहेत. ही स्थिती अशीच राहिली तर, येत्या आठवडाभरात मुंबईतील 50 टक्के हॉटेल्स बंद करावी लागतील. सध्या वडापाव, मसाला डोसा आणि तत्सम पदार्थांच्या दरात एकतर वाढ होईल किंवा ते हॉटेलमध्ये मिळणार नाहीत. दादर आणि अंधेरीसारख्या व्यावसायिक भागातील अनेक हॉटेल्सनी आपल्या मेनूमध्ये कपात करण्यास सुरुवात केली आहे.

मंत्रालया
Mumbai LPG Shortage: मुंबईत लहान, मध्यम हॉटेल्सना मोठा फटका

लाखोंचा पोशिंदा धोक्यात राज्यात सुमारे 45 ते 50 हजारांहून अधिक हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. त्यामध्ये बार ॲण्ड रेस्टॉरंटचाही समावेश आहे. सुमारे 8 ते 10 लाख कामगार या हॉटेल व्यवसायात काम करतात. त्यांच्यावर त्यांचे कुटुंब चालते. शिवाय या हॉटेल व्यवसायावर अवलंबून असलेले सुमारे दीड कोटीच्या आसपास लोक आहेत.

मंत्रालया
Mumbai Heatwave: मुंबईचे तापमान 39 अंशांवर; उष्णतेचा यलो अलर्ट

हॉटेल्समध्ये चुली पेटल्या बंगळुरुमध्ये एलपीजीच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्सने चक्क चुलीवरील स्वयंपाक सुरू केला आहे. बंगळुरुच्या हॉटेल्स असोसिएशनने सांगितले की, सोमवार दि. 10 मार्चपासून हॉटेल व्यावसायिकांची कसरत सुरू झाली आहे. एलपीजीचा पुरवठा किमान 2 महिने तरी अखंडित राहील असे सुरुवातीला पुरवठादारांनी सांगितले होते. मात्र सध्याची परिस्थिती भीषण आहे. बंगळुरुचे प्रसिद्ध विद्यार्थी भवन हे नाश्त्याचे ठिकाण लवकरच बंद होईल. सध्या या ठिकणी केवळ 5 सिलेंडर शिल्लक आहेत. मंगळवारी दुपारी कदाचित विद्यार्थी भवन बंद होऊ शकते.

मंत्रालया
Chembur Pizza Kitchen: पिझ्झा किचनमधून येणाऱ्या धूर, वासामुळे हृदयविकार

चेन्नईत अनेक हॉटेल्स बंद चेन्नईची स्थिती बंगळुरुपेक्षा वेगळी नाही. तेथे अनेक रेस्टॉरंट नाईलाजाने बंद करावी लागली आहेत. व्यावसायिक गॅसचा पुरवठा पूर्णपणे थांबल्याने सिलेंडरचा पुरवठाही बंद झाला आहे. सर्व ठिकाणी नो स्टॉकचे फलक लावण्यात आले आहेत. याबाबत पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांना चेन्नई हॉटेल असोसिएशनने पत्र पाठवून तोडगा काढण्याची विनंती केली आहे. चेन्नईतील प्रसिद्ध अन्नपूर्णा हॉटेलच्या मेन्यूतील अनेक पदार्थ गायब झाले आहेत. गॅसच्या तुटवड्याचा फटका कोलकात्यालाही बसला आहे. तेथील रेस्टॉरंट आणि बेकऱ्यांमध्ये सोमवारी पुरेल इतकाच गॅस होता. मंत्रालयाचे एक

मंत्रालया
Pradeep Sharma Antilia Case: वादग्रस्त प्रदीप शर्मा यांना उच्च न्यायालयाचा झटका; अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी दोषमुक्तीची याचिका फेटाळली

कॅन्टीनही होणार बंद मंत्रालयातील कॅन्टीनलाही सिलेंडर मिळत नसल्याने दोन तीन दिवसात ही कॅन्टीन देखील बंद ठेवण्यात येईल आणि महानगर गॅसची पाईप लाईन असलेली कॅन्टीन फक्त सुरु असेल असेही दयानंद शेट्टी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news