Mumbai Heatwave: मुंबईचे तापमान 39 अंशांवर; उष्णतेचा यलो अलर्ट

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उकाड्याचा इशारा; आरोग्य विभाग सतर्क
मुंबई ः प्रचंड उन्हामुळे त्रस्त झालेल्यांमध्ये मुंबईकरांप्रमाणेच लिला आणि ललीता देखील आहेत. संजय गांधी नॅशनल पार्कातील या बंगाली वाघीणी या निवाऱ्याच्या सावलीतून हलायला तयार नसतात. (छाया ः मृगेश बांदीवडेकर)
मुंबई ः प्रचंड उन्हामुळे त्रस्त झालेल्यांमध्ये मुंबईकरांप्रमाणेच लिला आणि ललीता देखील आहेत. संजय गांधी नॅशनल पार्कातील या बंगाली वाघीणी या निवाऱ्याच्या सावलीतून हलायला तयार नसतात. (छाया ः मृगेश बांदीवडेकर)Pudhari
Published on
Updated on

मुंबई: सूर्याच्या प्रकोपामुळे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये बुधवारी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.

सांताक्रूझ वेधशाळेमध्ये मंगळवारी पारा 39 अंशांवर गेला. सोमवारच्या तुलनेत (38.9 अंश सेल्सिअस) कमाल तापमानात वाढ कायम राहिली. बुधवारी (37 अंश सेल्सिअस) किंचित घट अपेक्षित आहे. मंगळवारी मुंबई महानगर प्रदेशातील काही भागात कमाल तापमान 38-40 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले गेले. जोरदार कोरडे वारे आणि कमकुवत समुद्री वाऱ्यांमुळे किनारपट्टीवरील थंड वारे बंद झाले आहे. ज्यामुळे सतत उष्णता वाढत आहे, असे हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

मुंबई ः प्रचंड उन्हामुळे त्रस्त झालेल्यांमध्ये मुंबईकरांप्रमाणेच लिला आणि ललीता देखील आहेत. संजय गांधी नॅशनल पार्कातील या बंगाली वाघीणी या निवाऱ्याच्या सावलीतून हलायला तयार नसतात. (छाया ः मृगेश बांदीवडेकर)
Chembur Pizza Kitchen: पिझ्झा किचनमधून येणाऱ्या धूर, वासामुळे हृदयविकार

मार्चच्या सुरुवातीलाच मुंबईत उष्णतेची लाट जाणवत असून हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार 37 अंशांपेक्षा जास्त तापमान सलग दोन दिवस राहिल्याने उष्णतेची लाट घोषित केली आहे. गेल्या चार दिवसांत तापमान 38 ते 40 अंशांच्या घरात पोहोचल्याने मुंबई, ठाणे आणि पालघर भागात उकाड्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई ः प्रचंड उन्हामुळे त्रस्त झालेल्यांमध्ये मुंबईकरांप्रमाणेच लिला आणि ललीता देखील आहेत. संजय गांधी नॅशनल पार्कातील या बंगाली वाघीणी या निवाऱ्याच्या सावलीतून हलायला तयार नसतात. (छाया ः मृगेश बांदीवडेकर)
Pradeep Sharma Antilia Case: वादग्रस्त प्रदीप शर्मा यांना उच्च न्यायालयाचा झटका; अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी दोषमुक्तीची याचिका फेटाळली

आरोग्य विभाग सतर्क

महामुंबई प्रदेशासह राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या चार दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने राज्यभरातील आरोग्य यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. संभाव्य उष्माघाताच्या घटनांना तोंड देण्यासाठी जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावरील सर्व आरोग्य संस्थांनी ‌‘कोल्ड रूम‌’ कार्यान्वित ठेवणे, औषधांचा पुरेसा साठा ठेवणे आणि संबंधित पोर्टलवरील नोंदी नियमित अद्ययावत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मुंबई ः प्रचंड उन्हामुळे त्रस्त झालेल्यांमध्ये मुंबईकरांप्रमाणेच लिला आणि ललीता देखील आहेत. संजय गांधी नॅशनल पार्कातील या बंगाली वाघीणी या निवाऱ्याच्या सावलीतून हलायला तयार नसतात. (छाया ः मृगेश बांदीवडेकर)
Harshvardhan Sapkal: देवेंद्र फडणवीस यांच्या पोटात होते ते ओठावर आले; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे उत्तर

नागरिकांनी दुपारच्या तीव्र उष्णतेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, हलके कपडे परिधान करणे आणि उष्माघातापासून बचावाचे उपाय पाळावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news