Chembur Pizza Kitchen: पिझ्झा किचनमधून येणाऱ्या धूर, वासामुळे हृदयविकार

चेंबूर प्रकरणी तक्रारीवर गांभीर्याने विचार करण्याचे महापालिकेला न्यायालयाचे निर्देश
Chembur Pizza
Chembur PizzaPudhari
Published on
Updated on

चेंबूरच्या ज्येष्ठ नागरिकाची

उच्च न्यायालयात धाव

तक्रारीवर विचार करण्याचे पालिका प्रशासनाला निर्देश

मुंबई : चेंबूर येथील पिझ्झा किचनमधून येणाऱ्या धूर, तीव्र वास व सततच्या आवाजामुळे रात्री झोप न येणे, ताणतणाव आणि श्वसनाच्या समस्यांमुळे हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकाकर्त्याच्या विनंतीची गंभीर दखल घेत न्यायालयाने मुंबई महापालिकेला ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीवर गांभीर्याने विचार करण्याचे निर्देश दिले. तक्रारीवर पालिकेने यापूर्वी कारवाई न केल्याप्रकरणी न्यायालयाने प्रशासनावर ताशेरे ओढले.

Chembur Pizza
Pradeep Sharma Antilia Case: वादग्रस्त प्रदीप शर्मा यांना उच्च न्यायालयाचा झटका; अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी दोषमुक्तीची याचिका फेटाळली

शहरातील वायु प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. याचदरम्यान चेंबूरच्या ज्येष्ठ नागरिकाने पालिका प्रशासनाच्या उदासीनतेविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. याचिकेची द्विसदस्यीय खंडपीठाने गंभीर दखल घेतली. ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीची छाननी प्रशासनाने केली होती, परंतु पुढील कोणतीही कारवाई केली नाही, असे ताशेरे खंडपीठाने ओढले. पिझ्झा किचनमधून बाहेर येणाऱ्या वासाचा आणि धुराचा त्रास ज्येष्ठ नागरिकाला होत आहे.

Chembur Pizza
Harshvardhan Sapkal: देवेंद्र फडणवीस यांच्या पोटात होते ते ओठावर आले; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे उत्तर

अशा स्थितीत ज्येष्ठ नागरिक याचिकाकर्त्याच्या तक्रारीची काळजीपूर्वक तपासणी करणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने नमूद केले आणि पालिका प्रशासनाला पिझ्झा किचनमधून बाहेर येणाऱ्या धूर आणि वासाच्या तक्रारीवर आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. जर पालिकेने स्वयंपाकघराविरुद्ध कोणतीही प्रतिकूल कारवाई प्रस्तावित केली असेल तर त्याच्या मालकांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले. सुनावणीवेळी याचिकाकर्त्यातर्फे ॲड. अजित मनवानी आणि

Chembur Pizza
Sanjay Gandhi National Park: नॅशनल पार्कमधील पाड्यांच्या पुनर्वसनावर आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

पालिकेतर्फे ॲड. एस. व्ही. तोंडवलकर यांनी युक्तिवाद केला. रहिवाशांच्या स्वच्छ, निरोगी, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त परिस्थितीचे पालन सुनिश्चित करण्यासाठी परवाने जारी करण्याचे, व्यावसायिक परिसर, रेस्टॉरंट्स, बेकरी आणि हॉटेल्सच्या कामकाजाचे पर्यवेक्षण करण्याचे तसेच या व्यावसायिक ठिकाणांद्वारे चालवल्या जाणाऱ्या क्रियाकलापांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार पालिकेला आहेत, असे उच्च न्यायालयाने नमूद केले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news