Heavy rain alert in Maharashtra | आणखी २ दिवस पावसाचे टेन्शन! राज्यातील 'या' भागांत अतिवृष्टी, जाणून घ्या कुठे कुठे अलर्ट?

राज्यात सर्वदूर पाऊस, अनेक ठिकाणी पूरस्थिती गंभीर
Heavy rain alert in Maharashtra Pune rain news
राज्यात सर्वदूर पाऊस सुरु अनेक ठिकाणी पूरस्थिती गंभीर बनली आहे. Pudhari photo

पुढारी ऑनलाईन डेस्क

मुंबईसह (Mumbai Rain) पालघर, ठाणे, रायगड, पुणे (Pune Rain Updates) सातारा जिल्ह्याला आज (दि.२५ जुलै) अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला आहे. रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्याला उद्याही २६ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूरला (kolhapur flood update today) उद्या २६ जुलै रोजी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुण्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (Heavy rain alert in Maharashtra)

Summary

Weather forecast : २५ जुलैला 'इथे' रेड अलर्ट

  • पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा

२६ जुलै रोजी कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट?

  • रायगड, रत्नागिरी, सातारा

मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट

  • २५ जुलै- रत्नागिरी, नाशिक, कोल्हापूर, गडचिरोली, चंद्रपूर

  • २६ जुलै- पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर

Heavy rain alert in Maharashtra Pune rain news
Pune Rain Updates | पुण्यात पावसाने हाहाकार; अंडाभुर्जीचा स्टॉल वाचवण्यासाठी गेलेल्या तिघांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

आज सांगली, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेडला जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांत पुढील ४ दिवस पावसाचा जोर राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यवतमाळमध्येही आज जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Heavy rain alert in Maharashtra Pune rain news
Pune Rain News : पुण्यात ३२ वर्षातील सर्वाधिक पाऊस, पर्जन्यवृष्टी 'सेंटिमीटर'मध्ये मोजण्याची वेळ

'या' भागांत अतिमुसळधार

कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Heavy rain alert in Maharashtra Pune rain news
Kolhapur Flood News| पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडल्याने शिरोळ तालुका भयभीत

मुंबईत पावसाचा अंदाज काय?

मुंबई शहर आणि उपनगरात पुढील २४ तासांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. अधूनमधून ६०-७० किमी ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे.

Mumbai Rain : चार जलाशये ओसंडून वाहू लागली

मुंबईत गेल्या २४ तासांत बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. परिणामी पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. सध्या विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर ही चार जलाशये ओसंडून वाहू लागली आहेत. आज सकाळी ६ वाजेपर्यंत पाणीसाठा ६६.७७ टक्के इतका नोंदवण्यात आल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

Heavy rain alert in Maharashtra Pune rain news
Radhanagari Dam : कोल्हापूरकरांचे टेन्शन वाढले! राधानगरी धरणाचे ४ दरवाजे उघडले (Video)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news