Pune Rain News : पुण्यात ३२ वर्षातील सर्वाधिक पाऊस, पर्जन्यवृष्टी 'सेंटिमीटर'मध्ये मोजण्याची वेळ

३२ वर्षांत विक्रमी पाऊस, हवामान तज्ज्ञांची माहिती
 Pune Rain News
मुसळधार पावसाने पुण्याला झोडपुन काढले. मुसळधार पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पुण्यातील नद्यांना पूर आला आहे. Pudhari File photo

पुणे : मुसळधार पावसाने पुण्याला झोडपुन काढले आहे. मुसळधार पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पुण्यातील नद्यांना पूर आला आहे. तर, तलाव ओसंडून वाहू लागले आहेत.

पुण्यात गेल्या ३२ वर्षांमध्ये इतका पाऊस झाला नसल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिलीय. ताम्हिणी घाटात गेल्या २४ तासात तब्बल ५५६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर, पुणे शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपले असून लोणावळा, शिरगाव, कोयना परिसरात तुफान पाऊस झाला आहे. आज (दि.२५) सकाळी ८.३० वाजेपर्यंत ताम्हिणीमध्ये ५५६ मिलिमीटर, लोणावळ्यात ३११ मिलिमीटर, कोयना १५७ मिलिमीटर, शिरगावमध्ये ४८४ मिलिमीटर, आंबोने इथं ४४० मिलिमीटर तर डंगरवाडी ४०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

 Pune Rain News
Pune Rain News | कडूस गावाला वरदान ठरलेला पाझर तलाव भरला

पुण्यात 32 वर्षातला सर्वात मोठा पाऊस : डॉ.अनुपम कश्यपी

मी गेली ३२ वर्षं पुण्यात राहात आहे. पावसाची आजची स्थिती ही गेल्या ३२ वर्षांतील सर्वांत भीषण अशी आहे. पाऊस हा मिलिमीटरमध्ये मोजण्याची पद्धत आहे. पण पाऊस इतका जास्त झाला आहे की सेंटिमीटरमध्ये पाऊस सांगण्याची वेळ आलेली आहे.

 Pune Rain News
Pune Traffic | रस्ते राहणार केंद्रस्थानी; वाहतूक विभागाची पुनर्रचना

11.5 सेंटिमीटर ते २४.४ सेंटिमीटर इतका पाऊस २४ तासात झाला तर याला अतिमुसळधार पाऊस म्हणतात. यापेक्षाही जास्त पाऊस झाला तर त्याला Extreme Heavy Rainfall म्हटले जाते. तर यापेक्षाही जास्त पाऊस होत असेल तर त्याला Exceptionally Heavy Rain म्हटले जाते. पुण्यातील काही ठिकाणी Exceptionally Heavy Rain झालेला आहे, तर बऱ्याच ठिकाणी Extreme Heavy Rainfall नोंदवण्यात आलेला आहे. माझ्या अंदाजानुसार पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट राहील, याचा अर्थ Extreme Heavy Rainfallची स्थिती पुढील चोवीस तासासाठी असेल. धरणातूनही पाणी सोडण्याची स्थिती निर्माण होईल, त्यामुळे जे सखल भाग आहेत, तिथे पाणी साठेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news