Mumbai Municipal Corporation: चार वर्षांनंतर मुंबई महापालिकेत राजकीय पर्व; स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे

शिक्षण समिती अध्यक्षपदी राजश्री शिरवाडकर; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माघारीमुळे भाजपाचे दोन्ही उमेदवार बिनविरोध
Mumbai Municipal Corporation
Mumbai Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समिती अध्यक्षपदी अखेर भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड झाली, तर शिक्षण समिती अध्यक्षपदी भाजपाच्या राजश्री शिरवाडकर विराजमान झाल्या. त्यामुळे मुंबई महापालिकेत तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राजकीय पर्व सुरू झाले आहे.

Mumbai Municipal Corporation
Maharashtra Budget Session: विरोधी पक्षनेत्यांविना अर्थसंकल्पीय अधिवेशन? निर्णय रखडल्याने राजकीय चर्चांना उधाण

महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीप्रमाणे स्थायी व शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने माघार घेतल्यामुळे भाजपाचे दोन्ही शिलेदार बिनविरोध निवडून आले. पीठासीन अधिकारी महापौर रितू तावडे यांनी दोन्ही समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करून अध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याचे सांगत, शिंदे व शिरवाडकर यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयजयकारासह जय श्रीरामच्या घोषणा दिल्या.

Mumbai Municipal Corporation
Udaan Yatri Cafe Mumbai Airport: मुंबई, नागपूर विमानतळावर मिळणार स्वस्त नाश्ता

प्रभाकर शिंदे हे मूळ शिवसैनिक असून त्यांनी 1973 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. उपशाखाप्रमुख शाखाप्रमुख, भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष, नगरसेवक, सभागृह नेते, बेस्ट समिती अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषवली आहेत. 2017 मध्ये त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला. राजश्री शिरवाडकर 2012 पासून भाजपाच्या नगरसेविका आहेत. महिला बालकल्याण समितीच्या त्या अध्यक्षाही राहिल्या आहेत.

स्थायी समितीवर 1997 पासून शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. शिवसेना-भाजपा युतीच्या काळात भाजपाला स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यास कायम शिवसेनेकडून नकार मिळाला होता. केवळ एक वेळा म्हणजे 1997-98 मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष पद भाजपाच्या सरदार तारासिंग यांना देण्यात आले होते. त्यामुळे प्रभाकर शिंदे हे भाजपाचे स्थायी समितीचे दुसरे अध्यक्ष ठरले आहेत.

Mumbai Municipal Corporation
Mumbai to Vijaydurg ferry service: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! यंदा शिमग्याला बोटीने गाठता येणार गाव; पाहा संपूर्ण वेळापत्रक

मराठी शाळांचा दर्जा सुधारणार

मराठी शाळांचा दर्जा उंचावण्यासह पटसंख्या वाढविण्यावर भर देणार आहे. मराठी शाळांची पटसंख्या कशी वाढेल, यासाठी ठोस उपाययोजना करणार आहोत. मराठी शाळा वाढविणे आणि त्यांचा दर्जा उंचावणे हा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे.

- राजश्री शिरवाडकर, अध्यक्षा, शिक्षण समिती

Mumbai Municipal Corporation
Bhiwandi Mayor Election 2026: काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपचा बंडखोर नारायण चौधरी भिवंडीचा महापौर

रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करा

पालिकेने सर्व गृहनिर्माण संस्थांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्यात यावे. शहरात स्वच्छता राखणे, रस्ते व वाहतूक यांचे नियोजन करणे, शैक्षणिक सोयीसुविधा देणे, तसेच अन्य नागरी सुविधांकडे आपण कटाक्षाने लक्ष देणार आहोत.

- प्रभाकर शिंदे, अध्यक्ष, स्थायी समिती

मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची, तर शिक्षण समिती अध्यक्षपदी भाजपाच्या राजश्री शिरवाडकर यांची बिनविरोध निवड झाली. दोघांचेही महापौर रितू तावडे यांनी अभिनंदन केले. (छाया ः दीपक साळवी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news