Mumbai Petrol Pump UPI: मुंबईकरांनो, पेट्रोल भरताना रोख पैसे ठेवावे लागणार? १५ ऑक्टोबरपासून UPI बंद करण्याचा इशारा

UPI वरील सुधारित MDR शुल्काला विरोध करत मुंबईतील पेट्रोल पंप चालकांनी १५ ऑक्टोबरपासून ₹२ हजारांवरील UPI पेमेंट बंद करण्याचा इशारा दिला आहे. पेट्रोल पंपांना MDR मधून सूट देण्याची मागणी करण्यात आली आहे.
Mumbai Petrol Pump UPI
Mumbai Petrol Pump UPIPudhari
Published on
Updated on

मुंबई: केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपासून दोन हजार रुपयांहून अधिक रकमेच्या 'पर्सन टू मर्चट' (पीटूएम) यूपीआय व्यवहारांवर सुधारित व्यापारी सवलत दर ( मर्चट डिस्काउंट रेट) लागू करण्याच्या निर्णया विरोधात मुंबईतील सर्व पेट्रोल पंपांवर यूपीआय पेमेंट बंद पुढील आठवड्यापासून बंद होईल. पेट्रोल डीलर्स असोसिएशन ऑफ मुंबईचे अध्यक्ष चेतन मोदी यांनीच तसे संकेत दिले.

काहीही झाले तरी २ हजार रूपयांपेक्षा जास्त यूपीआय व्यवहार न करण्यावर पेट्रोलपंप चालक ठाम आहेत. येत्या आठवड्याभरात संघटनेच्या फेडरेशनची संयुक्त बैठक ठाणे आणि मुंबईत होणार आहे. त्यानंतर तशी घोषणा केली जाईल,असे चेतन मोदी यांनी सांगितले.

यूपीआय व्यवहारांवर सुधारित व्यापारी सवलत दर ( मर्चट डिस्काउंट रेट) चा भुर्दंड नको म्हणून मुंबईतील सर्व पेट्रोल पंप चालक एकवटले आहेत. मुंबईत लहानमोठे २३७ पेट्रोलपंप आहेत. त्यापैकी १५० पेट्रोलपंप पेट्रोल डीलर्स असोसिएशन ऑफ मुंबईचे अधिकृत सदस्य आहेत.

Mumbai Petrol Pump UPI
Mumbai APMC Fruit Market: गणेशोत्सवात फळांचा बाजार फुलला! मुंबई APMC मध्ये १३० कोटींची उलाढाल; दरही वाढले

शिवाय ठाणे,नवीमुंबई येथेही फेडरेशनचे पेट्रोलपंप चालकही सदस्य आहेत. मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या पेट्रोलपंपापाचे चालक संघटनेचे सदस्य आहेत. त्यामुळे दोन हजार रुपयांपुढील यूपीआय पेमेंट बंद करण्याची तयारी मुंबईत जवळपास झालेली आहे.

दरम्यान, पेट्रोल पंपांवर अचानक यूपीआय ऑनलाईन पेमेंट घेणे बंद झाल्यास त्याचा मोठा फटका मुंबईतील वाहनधारकांना बसणार आहे. याबाबत समाजातील विविध स्तरांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

काहीजण या निर्णयामुळे रोख रक्कमेचा अधिक वापर करून तसेच व्यवसायातील प्राप्ती कमी दाखवून या नवीन करातून पळवाटा शोधतील.

परिणामी यूपीआयचा किंवा एमडीआरचा अतिरिक्त बोजा अखेरीस ग्राहकांवरच लादला जाईल, अशी भीती फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष, विरेन शाह यांनी व्‍यक्त केली.

Mumbai Petrol Pump UPI
UPI Transaction Fee: लहान व्यापाऱ्यांवरही पडणार यूपीआय शुल्काचा भार

एका अंदाजानुसार पंपावरील दोन हजारांपुढील एका व्‍यवहाराला पाच रुपये सरासरी एमडीआर मोजावा लागेल.

दुसरीकडे सोशल मीडियावर वाहनधारकांनी 'सरकारने विश्वासघात केला' अशा शब्दात नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news