Mumbai to Vijaydurg ferry service: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! यंदा शिमग्याला बोटीने गाठता येणार गाव; पाहा संपूर्ण वेळापत्रक

कोकणचा लाडका सण असलेल्या शिमगोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे.
Mumbai to Vijaydurg ferry service:
Mumbai to Vijaydurg ferry service:file photo
Published on
Updated on

Mumbai to Vijaydurg ferry service

मुंबई: कोकणचा लाडका सण असलेल्या शिमगोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. यावर्षी शिमग्याला कोकणी माणसाला थेट समुद्रातून बोटीने गावी जाता येणार आहे. १ मार्चपासून मुंबई (भाऊचा धक्का) ते विजयदुर्ग अशी 'एम टू एम' फेरी सेवा सुरू होत असून, याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Mumbai to Vijaydurg ferry service:
Ajit Pawar: अजित पवारांचे मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज देण्यास केंद्राचा नकार; RTI अर्ज फेटाळला

सात तासांत प्रवास पूर्ण

रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि रेल्वेच्या गर्दीतून सुटका करण्यासाठी सरकारने हा जलद मार्ग उपलब्ध करून दिला आहे. मुंबई ते विजयदुर्ग हे अंतर या फेरीमुळे अवघ्या सात तासांत पार करता येईल. या उपक्रमाची घोषणा करताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, १ मार्च रोजी होणाऱ्या पहिल्या प्रवासात ते स्वतःदेखील बोटीने प्रवास करणार आहेत.

असे असेल फेरीचे वेळापत्रक

प्रवाशांच्या सोयीसाठी १ मार्च ते ८ मार्च दरम्यानचे वेळापत्रक खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:

  • १ मार्च: भाऊचा धक्का येथून सकाळी ८ वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी ३ वाजता पोहोचेल.

  • २ मार्च: विजयदुर्ग येथून दुपारी १२ वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी ७ वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.

  • ४ मार्च: भाऊचा धक्का येथून सकाळी ८ वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी ३ वाजता पोहोचेल.

  • ५ मार्च: विजयदुर्ग येथून दुपारी १२ वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी ७ वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.

  • ७ मार्च: भाऊचा धक्का येथून सकाळी ८ वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी ३ वाजता पोहोचेल.

  • ८ मार्च: विजयदुर्ग येथून दुपारी १२ वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी ७ वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news