Mumbai Municipal Blood Donation: मुंबई महापालिकेच्या रक्तदान शिबिरांना प्रशासकीय अडथळे; रक्तकोंडीचा धोका वाढला

वाहन परवानगी प्रक्रियेत बदलामुळे शहराबाहेरील शिबिरे रद्द होण्याची शक्यता; रुग्णसेवेवर होऊ शकतो थेट परिणाम
Mumbai Municipal Blood Donation
Mumbai Municipal Blood DonationPudhari
Published on
Updated on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमार्फत दरवर्षी मुंबईसह शहराबाहेरील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. मात्र, रक्तसंकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या परवानगी प्रक्रियेत करण्यात आलेल्या बदलांमुळे ही शिबिरे आयोजित करणे कठीण बनले आहे. परिणामी येत्या काळात रक्तकोंडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होऊ शकतो.

Mumbai Municipal Blood Donation
Mumbai Fire Safety: मुंबईत चाळ-सोसायटी पदाधिकाऱ्यांना अग्निसुरक्षा प्रशिक्षण सक्तीचे; महापालिकेचा एकमताने निर्णय

पूर्वी रक्तसंकलनासाठी लागणारी वाहने शहराबाहेर नेण्यासाठी संबंधित रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांची स्वाक्षरी पुरेशी ठरत होती. त्यानंतर वाहन विभागाकडून मंजुरी दिली जात असे. मात्र, नव्या नियमानुसार अतिरिक्त आयुक्तांची स्वाक्षरी अनिवार्य करण्यात आली आहे. या बदलामुळे परवानगी प्रक्रियेत विलंब होत असल्याची तक्रार रक्तपेढ्यांकडून करण्यात येत आहे.

Mumbai Municipal Blood Donation
Mumbai Ro Ro Ferry: मुंबई–विजयदुर्ग एम-टू-एम रो-रो सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भाऊच्या धक्क्यावर आज शुभारंभ

विशेषतः पनवेलसारख्या शहराबाहेरील परिसरात नियमित रक्तदान शिबिरे घेतली जातात. एप्रिल-मे महिन्यांत आणि रमजान काळात शहरातील रक्तदान शिबिरांची संख्या घटते. अशा वेळी बाहेरील शिबिरांमधून होणारे रक्तसंकलन अत्यंत महत्त्वाचे ठरते. मात्र, वाहन परवानगीतील अडथळ्यांमुळे नियोजित शिबिरे रद्द करण्याची वेळ येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Mumbai Municipal Blood Donation
Bombay High Court: लिंगबदल केलेल्या विद्यार्थ्याला सुधारित पदवी द्या; मुंबई उच्च न्यायालयाचे एसएनडीटीला आदेश

केईएम रुग्णालयातून शिबिरासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देताना प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याची माहिती समोर आली आहे. कारण आता प्रत्येक वेळी अधिष्ठात्यांची स्वाक्षरी अनिवार्य करण्यात आली असून प्रक्रिया अधिक किचकट झाली आहे.

Mumbai Municipal Blood Donation
Chembur MHADA: चेंबूरमध्ये म्हाडा इमारतीवरून सहा कामगार कोसळले; एकाचा मृत्यू

दरम्यान, या निर्णयामुळे खासगी रक्तपेढ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालिका रक्तपेढ्यांच्या शिबिरांवर मर्यादा आल्यास खासगी संस्थांकडे मागणी वाढू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मुंबईबाहेर जाण्यासाठीची प्रक्रिया सुलभ करावी, अन्यथा शहराबाहेरील रक्तसंकलन थांबण्याची चिन्हे आहेत, अशी मागणी रक्तपेढ्यांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news