BMC Administration: मुंबई महापालिकेत मोठे फेरबदल; सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांची खांदेपालट

महापौर बदलानंतर प्रशासनात हालचाल; मार्चअखेर व्यापक बदलीची शक्यता
BMC
BMC Pudhari Photo
Published on
Updated on

मुंबई : प्रकाश साबळे

मुंबई महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट संपल्यानंतर महानगरपालिका पूर्णपणे अस्तित्वात आली आहे. महापालिकेत भाजपाचा महापौर विराजमान झाल्यानंतर आता पालिका प्रशासनात फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. मार्च 2025 च्या अखेरीस मोठ्या प्रमाणात प्रशासकीय फेरबदल होणार असून यात सहायक आयुक्तासह, उपायुक्त, सह आयुक्त यांचे खातेनिहाय खांदेपालट होणार असल्याची माहिती महानगरपालिका मुख्यालयातील सूत्रांनी दिली.

BMC
Dahanu Mahalaxmi Yatra 2026: डहाणूतील महालक्ष्मी यात्रेसाठी प्रशासन सज्ज; भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित

मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे मार्च महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी जाता-जाता प्रशासकीय सफाई करण्याचे ठरविले आहे. तसेच नव्याने निवडून आलेले नगरसेवक आणि सर्व समित्यांचे अध्यक्ष व सदस्य सहाय्यक आयुक्त व उपायुक्तांच्या कारभारावर नाखूश आहेत. अशा सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांना हटविण्यासाठी महापालिका मुख्यालयात हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच अधिकारी वर्गाकडूनसुध्दा मर्जीतील विभाग कार्यालय आणि झोन मिळविण्यासाठी नगरसेवकांच्या दरबारी पायघड्या घातल्या जात असल्याचे सध्या दिसून येत आहे.

BMC
Dahanu Housing Scheme: डहाणूत घरकुल घोटाळा उघड; अधिकाऱ्यावर शिस्तभंग कारवाई

मुंबई महापालिकेत प्रशासकीय कारभार चालविण्यासाठी 29 सहायक आयुक्त, 17 उपायुक्त आणि 4 सहआयुक्त संवर्गातील अधिकारी आहेत. यापैकी 26 सहाय्यक आयुक्त हे पालिकेच्या विभाग कार्यालय, तर 7 उपायुक्त झोनमध्ये कार्यरत आहेत. तसेच उर्वरित उपायुक्त महापालिका मुख्यालयातील घनकचरा व्यवस्थापन, सुधार, विशेष, सामान्य प्रशासन, सार्वजनिक आरोग्य विभागात आहेत. अशाप्रकारे सर्व या उपायुक्त, सहायक आयुक्त आणि सहआयुक्त यांच्या खातेनिहाय अंतर्गत बदल्या करण्याचे आयुक्त भूषण गगराणी यांनी ठरविले आहे. यासाठी मंत्रालयातून सूत्र हलविली जात आहेत. विधीमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर या बदल्या होणार आहेत. यात काही अधिकाऱ्यांना महत्वाचे खाते मिळणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर काहीना वेटिंगवर ठेवण्यात येणार असल्याचे कळाले.

BMC
Sunetra Pawar: रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर सुनेत्रा पवारांची पोस्ट चर्चेत; पाहा काय म्हटलंय?

नव्याने आलेल्या सहाय्यक आयुक्तांना फटका...

प्रशासकीय राजवटीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग संवर्गातून आलेल्या सहाय्यक आयुक्त यांचीसुद्धा इतरत्र विभाग कार्यालयात बदल्या होणार आहेत. यापैकी काही सहाय्यक आयुक्त नागरिकांसह लोकप्रतिनीधीचे फोन उचलत नसल्याच्या तक्रारी आयुक्त कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. अशा सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी करण्यात येणार आहे.

परिमंडळ, विभाग कार्यालयासाठी लॉबिंग

महानगरपालिकेत आता सर्व समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त झाल्या आहेत. यामुळे काही अधिकारी हे समिती अध्यक्ष व सदस्यांच्या बैठकांमुळे वैतागले आहे. यामुळे त्यांच्याकडून मुख्यालयातून बाहेर पडून विभाग कार्यालय किंवा परिमंडळात पोस्टिंग मिळविण्यासाठी लॉबिंग केले जात असल्याचे दिसून येत आहे.

BMC
Mira Bhayander Budget 2026: मिरा-भाईंदर महापालिकेच्या अर्थसंकल्पात १०२ कोटींची वाढ

या विभागात अतिरिक्त कार्यभार

महापालिकेच्या परिमंडळ 4 च्या उपायुक्त भाग्यश्री कापसे यांच्याकडे परिमंडळ - 7 चा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. तसेच वित्त विभागात 4 महिन्यांपासून उपायुक्त पदाची खुर्ची रिकामी आहे. असून त्याचा अतिरिक्त कार्यभार आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त प्रशांत गायकवाड संभाळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news