ED Raid Mumbai: डोंगरीतील दाम्पत्याची ५.८८ कोटींची मालमत्ता जप्त; दरमहा ८० किलो मेफेड्रोन पुरवठ्याचा आरोप

डोंगरीतील दाम्पत्यावर दरमहा ८० किलो मेफेड्रोन पुरवठ्याचा आरोप; कथित आर्थिक व्यवहारांचा ईडीकडून तपास
Police Raid
Police RaidPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: मुंबईतील डोंगरी परिसरातील एका दाम्पत्याचा मेफेड्रोन या अमली पदार्थाच्या तस्करीशी संबंध असल्याच्या आरोपावरून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. या प्रकरणात सुमारे ५.८८ कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली आहे.

संबंधित दाम्पत्यावर दरमहा सुमारे ८० किलो मेफेड्रोनचा पुरवठा केल्याचा आरोप असून, अमली पदार्थांच्या व्यवहारातून मिळालेल्या कथित उत्पन्नाचा मागोवा ईडी घेत आहे.

Police Raid
Sachin Ahir: गिरणी कामगारांना मुंबईतच अधिकाधिक घरे देण्याचा प्रयत्न; सचिन अहिर यांचे आश्वासन

ईडीच्या तपासानुसार, फैसल जावेद शेख आणि त्याची पत्नी अल्फिया शेख हे २०२२ पासून कथितरीत्या मेफेड्रोनच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सहभागी होते. ते सलीम डोला याच्याकडून प्रतिकिलो सात लाख रुपये दराने मेफेड्रोन खरेदी करून आठ लाख रुपये दराने विकत असल्याचा आरोप आहे. दरमहा सुमारे ८० किलो अमली पदार्थांचा पुरवठा केल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.

ईडीने यापूर्वी या प्रकरणात सात स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या होत्या. त्यांची एकूण किंमत सुमारे ५.८८ कोटी रुपये आहे. याशिवाय ४२ लाख रुपयांची रोकड, सुमारे १.७६ कोटी रुपयांचे १.६ किलो दागिने आणि अंदाजे ५६ लाख रुपये किमतीची तीन वाहने जप्त केल्याची, तसेच १२ बँक खाती गोठविली आहे.

Police Raid
Sion Hospital Doctor: सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरचा मृत्यू; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

या प्रकरणाचा तपास नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) मुंबईतील गुन्ह्याच्या आधारे सुरू झाला. कथित अमली पदार्थ तस्करीतून मिळालेल्या पैशांचा मागोवा घेताना सलीम डोला याच्याशी संबंधित पुरवठा साखळी आणि आर्थिक व्यवहार तपासण्यात आले.

ईडीने फैसल शेख, अल्फिया शेख आणि अन्य दहा जणांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) विशेष न्यायालयात अभियोग तक्रार दाखल केली आहे.

बनावट कंपन्या आणि बँक खात्यांद्वारे पैशांची गुंतवणूक

अमली पदार्थांच्या कथित विक्रीतून मिळालेली रोकड वैध उत्पन्न असल्याचे भासवण्यासाठी वैयक्तिक बँक खाती, नातेवाइकांची खाती आणि प्रत्यक्ष व्यवसाय नसलेल्या कंपन्यांचा वापर करण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे. या पैशांतून मुंबईत सदनिका आणि अन्य स्थावर मालमत्ता खरेदी करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news