Sion Hospital Doctor: सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरचा मृत्यू; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

पदव्युत्तर प्रथम वर्षात शिकणारे डॉ. शिवचरण आप्पा पाटील वसतिगृहातील बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळले
Sion Hospital
Sion Hospital Pudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: सायन रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. डॉ. शिवचरण आप्पा पाटील असे त्यांचे नाव असून ते शस्त्रक्रिया विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत होते. त्यांचा मृतदेह रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहातील खोलीच्या बाथरूममध्ये आढळला.

भूल देणाऱ्या औषधांच्या अतिमात्रेचा संशय व्यक्त होत असला, तरी मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून याबाबत तपास सुरू आहे.

डॉ. पाटील शनिवारी रुग्णालयातील वॉर्डमध्ये कामावर आले नसल्याचे लक्षात आले. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या रूम पार्टनरला खोलीत जाऊन पाहण्यास सांगण्यात आले.

Sion Hospital
Sanjay Raut News: देशात आणीबाणीसदृश परिस्थिती; संजय राऊतांची टीका

सहकाऱ्याने फोन केला असता मोबाइलचा आवाज बाथरूममधून ऐकू आला. त्यामुळे संशय आल्याने वरिष्ठांना माहिती देण्यात आली. त्यानंतर बाथरूममध्ये तपासणी केली असता डॉ. पाटील मृतावस्थेत आढळले.

प्राथमिक माहितीनुसार, डॉक्टरांच्या हाताला सलाईन लावलेली होती. घटनास्थळी भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या दोन बाटल्याही आढळल्या. दरम्यान, डॉ. शिवशरणप्पा पाटील यांच्या मृत्यूबद्दल मुंबई महापालिका निवासी डॉक्टर संघटनेने ( मार्ड) दुःख व्यक्त केले आहे.

Sion Hospital
Thackeray Brothers Protest: सीजेपीच्‍या समर्थनार्थ ठाकरे बंधूंचा ठिय्या; आजपासून तीव्र आंदोलनाचा इशारा

या घटनेच्या पार्श्वभूमीवर निवासी डॉक्टरांचे दीर्घ ड्युटीचे तास, कामाचा अतिताण आणि अपुरी मनुष्यबळ व्यवस्था याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news