Mumbai local train : मरेवर आणखी एक 15 डब्ब्यांची लोकल; प्रवाशांना दिलासा

दादर स्थानकात स्वतंत्र उपमार्गिका उभारणार
Mumbai local train
मरेवर आणखी एक 15 डब्ब्यांची लोकल; प्रवाशांना दिलासाpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मध्य रेल्वेने लोकल गर्दी कमी करण्यासाठी 15 डब्यांच्या लोकल चालवण्यास सुरुवात केली असून तिसरी लोकल लवकरच सेवेत दाखल होईल. तसेच दादर रेल्वे स्थानकावर 15 डब्यांच्या उपनगरी रेल्वेगाड्या उभ्या करण्यासाठी स्वतंत्र उपमार्गिका (स्टेबलिंग लाइन्स) उभारण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मध्य रेल्वेवर सध्या 12 डब्यांच्या लोकल सेवा देत आहेत. मात्र प्रवाशांची संख्या पाहता गर्दीच्या वेळी प्रवाशांना लोकलमध्ये शिरताही येत नाही. त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. यावर उपाय म्हणून 15 डब्यांच्या लोकलची संख्या वाढवण्यात येत आहे. सध्या मध्य रेल्वकडून दररोज 1,820 उपनगरीय लोकल फेऱ्या चालवल्या जातात.

Mumbai local train
Railway Relief News: डहाणू-खारबाव-जेएनपीए मालगाडीची चाचणी यशस्वी; लोकल वाढीचा मार्गही मोकळा

त्यात 15 डब्यांच्या दोन लोकल आहेत. सीएसएमटी ते कल्याण दरम्यान धावतात. 11 अप आणि 11 डाऊन अशा एकूण 22 फेऱ्या होत आहेत. लवकरच तिसरी लोकल दाखल होईल. त्यामुळे या फेऱ्यांत वाढ होईल व प्रवाशांना दिलासा मिळेल असे रेल्व प्रशासनाचे म्हणणे आहे.

Mumbai local train
Mumbai Local Train Megablock: रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

सध्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात 15 डब्यांच्या गाड्या ठेवण्यासाठी सीएसएमटी फलाट क्रमांक 7 आणि कल्याण येथील मालगाडी यार्डचा वापर केला जातो. मात्र, जागा मर्यादित असल्याने 15 डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य झाले होते. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकात 15 डब्यांच्या उपनगरी रेल्वेगाड्या उभ्या करण्यासाठी स्वतंत्र उपमार्गिका (स्टेबलिंग लाइन्स) उभारण्याचे नियोजन आहे.

34 फलाटांचे विस्तारीकरण

मरेवरील अनेक स्थानकांचे फलाट केवळ 12 डब्यांच्या गाड्यांसाठी अनुकूल आहेत. ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी फलाटांच्या विस्तारीकरणाचे महत्त्वाकांक्षी काम सुरू आहे. कोपर, शहाड, मुंब्रा, कळवा, ठाकुर्ली, आंबिवली, टिटवाळा, वासिंद, आसनगाव, आटगाव, कसारा, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शेलू, भिवपुरी, कर्जत, खोपोली आणि पळसदरी या स्थानकांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news