Mumbai Local Train Megablock
Mumbai Local Train MegablockPudhari

Mumbai Local Train Megablock: रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

रूळ व सिग्नल दुरुस्तीची कामे; अनेक लोकल रद्द, विशेष फेऱ्यांची व्यवस्था
Published on

मुंबई : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील कुर्ला -वाशीदरम्यानही ब्लॉक असल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल होणार आहेत.

Mumbai Local Train Megablock
Mumbai Municipal Corporation: मुंबई महापालिका सभागृहातील अंतर्गत रचना बदलणार

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवर जलद मार्गावर ब्लॉक असल्यान सर्व लोकल धीम्या मार्गावरुन धावतील. माटुंगा-मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 दरम्यान ब्लॉक असेल. ठाणे येथून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 दरम्यान सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर राम मंदिर-बोरिवली रेल्वे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गिका आणि पाचवी मार्गिकेवर सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत बोरिवली अंधेरीदरम्यान अप जलद मार्गिकवरील सर्व लोकल सेवा अप धीम्या आणि सहाव्या मार्गिकवर चालवण्यात येईल.

Mumbai Local Train Megablock
APMC Navi Mumbai: मुबलक आवकेमुळे भाजीपाला स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा

हार्बर मार्ग

हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 दरम्यान ब्लॉक असेल. परिणामी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 दरम्यान सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/ पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल, तसेच पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.17 ते दुपारी 3.47 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कुर्ला आणि पनवेल-वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news