

मुंबई : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन प्रेयसीवर तिच्याच प्रियकराने लैगिंक अत्याचार केला, मात्र नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. या नकारानंतर प्रेयसीच्या तक्रारीवरुन २८ वर्षांच्या प्रियकराविरुद्ध कुरार पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पिडीत मुलगी अंधेरीतील रहिवाशी असून सध्या ती कॉलेजमध्ये शिक्षण घेते. आरोपी हा तिचा परिचित असून तो मालाडच्या पठाणवाडीत राहतो. ती सोळा वर्षांची असताना त्याने तिला बॉयोलॉजीचे नोट्स घेण्यासाठी त्याच्या मालाड येथील घरी बोलाविले होते. त्यामुळे ती त्याच्या घरी गेली होती.
यावेळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने तिच्याशी जवळीक साधून लगट करण्याचा प्रयत्न केला. तुला प्रपोज करुन लग्नाची मागणी घातली होती. त्यानंतर तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. लग्नाचे आमिष दाखवून तो तिच्यावर लैगिंक अत्याचार करत होता. काही दिवसांपूर्वीच तिने त्याला लग्नाविषयी विचारणा केली होती, यावेळी त्याने तिच्याशी लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.
या नकारामुळे ती मानसिक तणावात आली होती. त्यातून तिने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. दोन दिवसांपूर्वी तिने घडलेला प्रकार कुरार पोलिसांना सांगून तिच्या २८ वर्षांच्या प्रियकराविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.