Mumbai Crime : बोरिवलीत ८३ लाखांच्या फ्लॅटची फसवणूक; बिल्डरला बेड्या

गुन्हा दाखल होताच पळून गेल्यानंतर तीन वर्षांनी केली अटक
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

मुंबई : तब्बल ८३ लाखांच्या फ्लॅट फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड बिल्डरला बोरिवली पोलिसांनी अटक केली. उदय कृष्णराव परब असे या आरोपी बिल्डरचे नाव असून श्रीपाद डेव्हलपर्सचा मालक आहे. गुन्हा दाखल होताच पळून गेल्यानंतर त्याच्यावर तीन वर्षांनी अटकेची कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

यातील तक्रारदार कांदिवली परिसरात राहत असून ते व्यावसायिक आहेत. त्यांचा हिरे आणि रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. त्यांची मालाड येथे एक खाजगी कंपनीत आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांना नवीन फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती. त्यामुळे ते नवीन इमारतीमधील फ्लॅट खरेदीसाठी प्रयत्न करत होते. याच दरम्यान त्यांना श्रीपाद डेव्हलपर्सच्या बोरिवलीतील राम मंदिर रोड, लक्ष्मी कृपामध्ये लक्ष्मी कृपा या इमारतीच्या पुर्नविकास इमारतीविषयी माहिती समजली होती.

Crime News
Mumbai footpath encroachment : मालाडमध्ये फुटपाथ मोकळा करण्यासाठी जागोजागी बॅनर

पुर्नविकास करणार्‍या उदय परब यांच्या कंपनीच्या कार्यालयात गेले होते. तिथे त्याची भेट घेतल्यानंतर त्याने त्यांना पाचव्या मजल्यावर ६१२ चौ. फुटाचा फ्लॅट देण्याचे आश्‍वासन दिले होते. याच फ्लॅटसाठी त्याने त्यांच्याकडून ८३ लाख ३४ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर त्यांच्यात फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झाले होते.

रजिस्ट्रेशननंतर त्याने त्यांना फ्लॅटचे लहानसहान काम सुरु आहे. ते काम पूर्ण होताच त्यांना फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने फ्लॅटचा ताबा दिला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी लक्ष्मी कृपा सोसायटीमध्ये जाऊन पाहणी केली होती. यावेळी त्यांना त्यांचा फ्लॅट दुसर्‍याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे दिसून आले.

Crime News
Mumbai local train accident insurance : लोकल प्रवाशांना तिकीट, पासवर अपघाती विमा?

सोसायटीच्या फ्लॅटधारकाच्या बोर्डवर त्याचेच नाव होते. या प्रकारानंतर त्यांनी उदय परबला जाब विचारुन फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांची मागणी केली होती. यावेळी त्याने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी उदय परब याच्याविरुद्ध तक्रार केली होती.

आरोपीला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुक, जिवे मारण्याची धमकी देणे, महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिका अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच उदय परब हा पळून गेला होता. त्यामुळे त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविणयात आले होते. गेल्या तीन वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या उदय परबला अखेर गेल्या आठवड्यात पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्याला न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news